Bail Pola Festival: पावसाच्या दडी फटक्यातही पोळ्याचा जल्लोष; शेतकऱ्यांनी सजवले बैल, गावागावात आज रंगणार झडत्यांची जुगलबंदी
esakal August 23, 2025 04:45 AM

नागपूर : वर्षभर राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण आज शुक्रवारी ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.

यंदा आधी दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबिन गेले असताना व इतर पिकांना आता आलेल्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अशा अडचणीत पोळा साजरा केला जात आहे. त्यासाठी ग्रामीण भागात विशेष उत्साह दिसत आहे. आज पोळ्यात झडत्यांची जुगलबंदीही रंगणार आहे. पोळ्याचा हा उत्साह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण घेऊन आला आहे.

शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार कोण असेल तर हे बैलच असतात. एप्रिल. मेमध्ये नांगरणी केल्यावर जून - जुलैमध्ये पेरणीची मोठी जबाबदारी शेतकरी या बैलांच्या बळावर उचलतो. मग डवरणी, दुबार-तिबार पेरणी आली तर तीसुद्धा तेवढ्याच जोशात केली जाते.

पिके थोडी मोठी झाली की जरा शेतीच्या कामापासून त्यांना थोडा ब्रेक मिळतो. तेव्हाच मोठा पोळा येतो. गुरुवारी ग्रामिण भागात पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची हळद आणि तुपाने खांदे मळणी करण्यात आली. त्यानंतर बैलांना पुरणपोळी, घुगऱ्या इतर खाद्यपदार्थ खाऊ घातले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महिनाभरापासून तजवीज करून ठेवली आहे.

Sunil Bagul : व्हिडिओ हटविण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; बागूल यांची अटकपूर्व सुनावणी पुढे ढकलली

पोळ्याच्या सणाच्या दिवशी पळसाचे मेढे दारात लावण्यात आले. पोळ्याला बैलांना रंगवून आकर्षक सजवून बैलजोड्यांना शुक्रवारी पोळ्यात नेल्या जाणार आहेत. तेव्हा तोरणाखाली झडत्यांची जुगलबंदी रंगणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.