तापाने त्रस्त असूनही संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये रुग्णालयातून थेट मैदानावर उतरला.
त्याला हॉस्पिटलमध्ये सलाईन व प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्याने कोची ब्लू टायगर्ससाठी सामना खेळला.
सामन्यानंतर संजू पुन्हा रुग्णालयात गेला आणि आता तो घरी विश्रांती घेत आहे.
Brave Sanju Samson fighting spirit : भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा तापाने फणफणला होता आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण, केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये आपल्या संघासाठी तो रुग्णालयामधून थेट क्रिकेटच्या मैदानावर खेळायला आला. गुरुवारी दुपारी संजू तिरुअनंतपूरम येथील रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. त्याने प्राथमिक उपचार घेतले आणि त्याला सलाईनही लावले गेले होते. पण, त्यानंतर तो सायंकाळी कोची ब्लू टायगर्स संघासाठी तो मैदानावर उतरला.
MyKhel ने दिलेल्या वृत्तानुसार सामन्यानंतर संजू पुन्हा रुग्णालयात गेला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भारतीय स्टार खेळाडू सध्या त्याच्या घरी आहे, परंतु तो कोचीसाठी पुढील सामना खेळण्याची अपेक्षा आहे. सॅमसनला थोडा ताप आहे आणि तो आजारी आहे. येत्या काही आठवड्यात त्याला भारतीय संघासोबत आशिया चषक स्पर्धेसाठी जायचे असल्याने खबरदारीचा उपाय घेतला जातोय.
ICC World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल; नवी मुंबईच्या डी वाय पाटीलवर होणार फायनलसह ५ सामने"संजूला ताप आहे आणि त्याला खोकला देखील आहे. त्याची प्रकृती सध्या ठीक नाही, परंतु तो बरा होत आहे आणि विश्रांती घेत आहे. तो शुक्रवारी रुग्णालयात होता आणि आता तो घरी आहे," असे संजू सॅमसनच्या अगदी जवळच्या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर MyKhelला सांगितले.
संजूने जवळजवळ संपूर्ण सामना क्षेत्ररक्षण केले. परंतु तो फलंदाजीला आला नाही. संजूचा मोठा भाऊ आणि कोची ब्लू टायगर्सचा कर्णधार सॅली सॅमसननेही सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावून त्यांना विजय मिळवून दिला. ३१ वर्षीय खेळाडूला केसीएल २०२५ च्या लिलावात कोची ब्लू टायगर्स फ्रँचायझीने विक्रमी किमतीत खरेदी केले.
Asia Cup 2025: ना संजू, ना रिंकू... अजिंक्य राहणेनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या संघाला रोखणे अवघडसंजूने आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. शुभमन गिलचा आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात निवड झाल्याने संजूचे सलामीचे स्थान धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत संजूने KCL मध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची तयारी दाखवून टीम इंडियाला पर्याय दिला आहे.