संगमनेर: मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. त्यामुळे कधीही मरायला तयार आहे. पण मागे हटणारा नाही. भीती दाखवून, धमक्या देऊन आमचं पाऊल रोखता येणार नाही, अशा ठाम शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका जाहीर केली.
Ahilyanagar News: 'श्रीगोंदे नगरपरिषद निवडणुकीच्या हालचाली गतिमान'; इच्छुकांची संख्या मोठी, आरक्षण ठरवणार अनेकांचे भवितव्यकीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी थोरात यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरात गुरुवारी (ता.२१) सकाळी ऐतिहासिक सद्भावना रॅली काढण्यात आली. ही रॅली नवीननगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनासमोर आली आणि तेथे सभेत तिचे रूपांतर झाले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रभावती घोगरे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, अमर कतारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, हा मोर्चा ऐतिहासिक आहे. यासाठी दुसऱ्या तालुक्यातून लोक आणावे लागले नाहीत. हीच खरी जनतेची ताकद आहे. निवडणुकीच्या आधीही असेच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला होता. सातत्याने विष पेरण्याचे काम होत आहे. पण संगमनेरकरांनी कधीही ते यशस्वी होऊ दिले नाही.
मी तालुक्यातील सर्व देवालयांना निधी दिला. अखंड हरिनाम सप्ताहांना प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदाय हा कोणत्याही धर्माचा किंवा पक्षाचा नाही, तो मानवधर्म सांगतो. पण आता काही जण बाहुल्या बनून अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालुका कधीच हे सहन करणार नाही. घुलेवाडीत झालेली घटना ही नियोजित होती. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र आहे.
सत्यजित तांबे म्हणाले,‘‘ ज्यांनी या तालुक्याला निळवंडेचे पाणी दिले, शहराला स्वच्छ पाणी दिले, राज्यात संगमनेरचे विकासाचे मॉडेल उभे केले त्यांच्यावर टीका होत आहे. म्हणजे ती थोरातांवरील नाही, तर संपूर्ण तालुक्यावरील टीका आहे. आमचे हिंदुत्व कोणाला त्रास देणारे नाही; उलट प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणारे आहे.
जयश्री थोरात म्हणाल्या, आज संगमनेरात सर्व जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. धर्माच्या नावावर वाद कधी निर्माण केला नाही. जर तुमच्या समोर नथुराम गोडसे आला, तर तुमची एकटी लेक नव्हे, तर संपूर्ण तालुका तुमच्या ढालीसारखा उभा राहील. डोळ्यात डोळे घालून बोला.
MLA Amol Khatal: संगमनेर तालुक्यातील विकासाची घडी त्यांना पाहवत नाही: आमदार अमोल खताळ; बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाहीलोकप्रतिनिधी कोणाच्या तरी हातातील बाहुले बनून संगमनेरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा तालुका असे प्रकार कधीच सहन करणार नाही. आपल्या सहकाराची परंपरा मोडीत काढून तालुक्याची वाट लावण्याचे काहींचे डाव सुरू आहेत. पण असे विघातक मनसुबे आपण सर्वांनी एकजुटीने हाणून पाडायचे आहेत.
बाळासाहेब थोरात, माजी मंत्री