Salaried Employees: पगारदार वर्गासाठी दिलासादायक बातमी; आता 'या' सुविधांवर मिळणार मोठी करसवलत
esakal August 23, 2025 05:45 AM
  • CBDT च्या नव्या नियमांनुसार पगारदारांसाठी पर्क्सवर करमाफीची मर्यादा 50 हजारांवरून थेट 4 लाखांपर्यंत वाढली.

  • परदेशी वैद्यकीय उपचारासाठी करमुक्त मर्यादा 2 लाखांवरून 8 लाखांपर्यंत वाढवण्यात आली.

  • यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना थेट कराचा दिलासा मिळणार आहे.

  • Big Tax Relief for Employees: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवे नोटिफिकेशन जाहीर केले असून लाखो पगारदार करदात्यांना यामुळे थेट दिलासा मिळणार आहे. आयकर नियम, 1962 मध्ये दोन नवे नियम 3C आणि 3D जोडण्यात आले असून हे बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू झाले आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम मूल्यांकन वर्ष 2026-27 पासून दिसेल.

    आधीची मर्यादा होती फक्त 50 हजार

    याआधी जर कोणत्याही कर्मचाऱ्याचापगार (फक्त मूळ पगार – भत्ते वगळून) वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर नियोक्त्याकडून मिळणाऱ्या सुविधा (जसे कार, वॉचमॅन, माळी, मोफत शिक्षण, वीजपाणी इ.) यावर कर भरावा लागत होता. आता ही मर्यादा थेट 50 हजारांवरून 4 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

    Job Growth: नोकरीचं टेन्शन संपलं! 2030 पर्यंत या क्षेत्रात 2.5 लाख नोकऱ्या निर्माण होणार सामान्य कर्मचाऱ्यांना मोठा फायदा

    नव्या नियमानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 4 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्याला नियोक्त्याकडून अशा सुविधा मिळाल्या, तर त्यावर कुठलाही कर भरावा लागणार नाही. म्हणजेच, पूर्वी 50 हजार रुपयांच्या पगारावरही कर लागू होत होता; पण आता लाखो कर्मचाऱ्यांना थेट करमाफी मिळणार आहे.

    परदेशी उपचारांवरही करसवलत वाढली

    फक्त पगारापुरतेच नाही, तर परदेशात वैद्यकीय उपचारांसाठी देखील दिलासा मिळाला आहे. याआधी 2 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करमुक्त मानला जात होता. आता ही मर्यादा थेट 8 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे कंपनीकडूनजास्तीत जास्त मदत मिळाली तरी कर्मचाऱ्याला त्यावर कराचा बोजा बसणार नाही.

    Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होणार?

    नवे नियम प्रामुख्याने ‘स्पेसिफाईड एम्प्लॉयी’ यांच्यावर लागू होतील. म्हणजेच –

    • कंपनीचा संचालक

    • ज्याच्याकडे कंपनीतील 20% किंवा त्याहून जास्त मतदानाधिकार आहेत

    • ज्याचा पगार 4 लाखांपेक्षा जास्त आहे

    FAQs

    प्रश्न 1: हे नियम कधीपासून लागू होणार?
    - 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. याचा प्रत्यक्ष परिणाम मूल्यांकन वर्ष 2026-27 पासून दिसेल.

    प्रश्न 2: करमाफीची नवी मर्यादा किती आहे?
    - वार्षिक 4 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना करमाफी मिळेल.

    प्रश्न 3: परदेशी उपचारांसाठी कितीपर्यंत करमुक्त मर्यादा आहे?
    - 8 लाख रुपये.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.