प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई - कोकण वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल; मध्य रेल्वेचा निर्णय
Saam TV August 24, 2025 12:45 PM
  • गणेशोत्सवानिमित्त मुंबई-मडगाव वंदे भारत १६ डब्यांची धावणार.

  • २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान विशेष गाडीचं वेळापत्रक जाहीर.

  • दादर, ठाणे, पनवेलसह कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे.

  • चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं घेतला दिलासा देणारा निर्णय.

अवघ्या काही दिवसांत गणपती बाप्पा घराघरात विराजमान होतील. राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला राज्य महोत्सवाचा दर्जाही देण्यात आलाय. गणेशत्सवाला प्रामुख्यानं चाकरमानी गावची वाट धरतात. घराघरांत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात. आता चाकरमान्यांसाठी एक खूशखबर. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पावलं उचलण्यात येत आहे. मुंबई- मडगाव वंदे भारतबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

कोकणात जाण्यासाठी विशेष मुंबई - मडगाव वंदे भारत धावते. या रेल्वेला प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबई - मडगाव वंदे भारत ८ डब्यांची धावते. आता गणेशोत्सवानिमित्त खास वंदे भारत एक्स्प्रेस १६ डब्यांची करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात प्रवाशांची दगदग होऊ नये, यासह प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सचा व्हिडिओ व्हायरल

हा बदल तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे. गणेशोत्सवात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.

१६ डब्यांची मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून खास २५,२७ आणि २९ ऑगस्ट रोजी धावणार आहे. तर, मडगावहून २६,२८ ते ३० ऑगस्ट रोजी धावणार आहे. मध्य रेल्वेनं घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

खड्ड्यांमुळे डॉक्टरचा मृत्यू; स्कूटीसह खाली पडले, ट्रकनं चिरडलं, नेमकं घडलं काय?

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस किती थांबे किती?

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. तर, दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मडगावला पोहोचेल. तर, परतीच्यावेळी मडगावातून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. तर, रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.

या प्रवासादरम्यान, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम या स्थानकांवर वंदे भारत थांबेल.

२० हजार नोकऱ्या, ४० हजार कंपन्या अन् ३,२२,२४,००,३०,००० रूपयांची उलाढाल; भारतीय ऑनलाइन गेम्सचं साम्राज्य किती मोठं?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.