Usha Nadkarni: ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सविता देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना आज कोणत्याचं ओळखीची गरज नाही. फक्त मराठीच नाही तर, त्यांनी हिंदी सिनेमाविश्वात देखील स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी लहानपणी घडलेल्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. त्यांनी त्यांच्या आई – वडिलांबद्दल फार काही सांगितलं. त्याचे वडील हवाई दलातील अधिकारी होते. त्यामुळे ते प्रचंड शिस्तप्रिय आणि कडक शिस्तीचे होते.
उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘ते खूप कडक होते…., ते प्रचंड हिंसक देखील होते. आम्ही भावंड त्यांना घाबरायचो… आमच्यामध्ये एकाला मारलं तर, दोघे पळून जायचे…. एकदा माझ्या भावाला काही कारणामुळे वडिलांनी मारलं होतं आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला… तेव्हा त्यांनी मला कुऱ्हाडीने मारलं… माझ्या हाताला जखम झालेली आणि दुसऱ्या दिवशी माझं नाटक होतं. तेव्हा जखमी अवस्थेत मी रंगमंचावर होते…’
पुढे नाडकर्णी म्हणाल्या, ‘वडील मारत असताना एकदा तर माझा भाऊ बेशुद्ध झाला… वडील अनेकदा थोड्या प्रेमाने राग शांत करण्याचा प्रयत्न करायचे. एवढंच नाही तर, मारल्यानंतर आमच्यासाठी आमच्या आवडीची आईस्क्रिम देखील आणायचे…’, उषा नाडकर्णी कायम त्यांच्या बालपणाबद्दल सांगत असतात…
उषा नाडकर्णी यांचे वडील लहान – लहान चुकांवर रागवायचे… यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘जर त्यांना वर्तमानपत्र दुमडलेलं दिसकं की ते रागवायचे आणि वर्तमानपत्र फाडायचे… आमच्या शाळेतील पुस्तकं देखील योग्य प्रकारे ठेवले नसतील तर ते फाडून टाकायचे…माझी आई वडिलांना म्हणायची की मुलांना नवीन पुस्तकं खरेदी करायची आहेत, म्हणून ती फाडू नका. ‘
आई – वडील होते अभिनयाच्या विरोधात…उषा नाडकर्णी यांनी सांगितल्यानुसार, आई – वडील दोघेही अभिनयाच्या विरोधात होते. मला अभिनेत्री व्हायचं आहे असं सांगितल्यानंतर ते माझ्यावर रागावले होते. माझे सर्व कपडे त्यांनी घराबाहेर फेकले होते आणि मला घराबाहेर काढलं होतं… तेव्हा एक आठवडा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहत होती… त्यानंतर वडीलच मला घ्यायला आले… असं देखील उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या.