1 प्रिया बापटने खिडकीतून आत्मा घरात शिरल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला.
2 तो आत्मा तिच्या वडिलांच्या बाजुला बसल्याचं तिने मुलाखतीत उघड केलं.
3 तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलाय.
अभिनेत्री प्रिया बापट हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. अशातच आता तिचा लवकरच 'बिना लग्नाची गोष्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसंच ती वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अंधेरा' या वेबसीरिजमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिने इन्स्पेक्टर कल्पना कदम हिची भूमिका साकारली आहे. त्यात तिचं सगळ्या स्तरावर कौतूक होताना पहायला मिळतय.
दरम्यान या सीरिजमधील कलाकरांच्या विविध मुलाखती होताना पहायला मिळत आहे. यावेळी एका मुलाखतीत प्रियाने तिच्यासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यात तिने वास्तूपुरष एका आत्म्या संदर्भातील घडलेली घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
View this post on InstagramA post shared by Divay Agarwal (@divayagarwal)
प्रिया बापट हिने 'अंधेरा' या वेब सीरिजमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. तिची ही आठ भांगाची हॉरर सीरिज आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, करणवीर मल्होत्रा यांचा देखील दमदार अभिनय पहायला मिळणार आहे. दरम्यान या सीरिज संदर्भात प्रियाने एका मुलाखतीमध्ये धक्कादायक अनुभव शेअर केलाय.
ती म्हणाली की, 'तिचं घर दादारमध्ये म्हणते असते. एकदा तिला जाणवलं की, कोणीतरी खिडकीतून घरामध्ये शिरलं. तो आत्मा केवळ आजुबाजुला बघत होता बाकी काही करत नव्हता. तसंच घरात मला घुंगराचा छन छन असा आवाज येत होता. तो आवाज हळू हळू पुढे पुढे माझ्या आई बाबांच्या बेडरुमकडे जात होता. तशी मी खुप घाबरट आहे पण मला त्यावेळी अजिबात भीती वाटली नाही. तो आवाज पुढे जाताना मला जाणवत होतं.'
प्रिया पुढे म्हणाली की, 'आई-बाबांच्या बेडरुमकडे गेल्यावर आवाज स्थिर झाला, थोडावेळ पुन्हा आवाज आला आणि सगळं शांत झालं. ही सगळी घटना पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली. मी विचारल केला की, आई-बाबांना सकाळी हे सांगेन. परंतु त्यांनीच मला सांगितलं की, 'मलाही कोणतरी माझ्या बाजुला येऊन बसलेलं जाणवलं. नंतर कोण होतं ते निघून गेलं' असं म्हणतात ती वास्तूपुरुष होती. कोकणात याविषयी बोललं जातं' असं प्रिया मुलाखतीत बोलताना म्हणाली.
सध्या प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी स्वत: ला आलेला अनुभवही शेअर केला आहे. तर काहींना प्रियाला ट्रोल केलय. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं काहींनी म्हटलय. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
FAQs
हा अनुभव कधी घडला?
पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
प्रिया बापट सध्या कोणत्या वेबसीरिजमध्ये काम करतेय?
ती 'अंधेरा' या हॉरर वेबसीरिजमध्ये इन्स्पेक्टर कल्पना कदमची भूमिका साकारतेय.
चाहत्यांची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया होती?
काहींनी सहानुभूती दाखवली तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं.
रेखा नाहीतर प्रियांका चोप्रासोबत होते अक्षय कुमारचे विवाहबाह्य संबंध? दिग्दर्शकांनी सांगितली आतली गोष्ट, म्हणाले, 'सिनेमाच्या शुटिंगवेळी...'