'सकाळ वास्तू एक्स्पो'मुळे सर्वोत्तम गृहखरेदीचा पर्याय
esakal August 25, 2025 10:45 AM

पिंपरी, ता. २४ : ‘‘सकाळ वास्तू एक्स्पोच्या माध्यमातून खरोखर सर्वोत्तम गृहखरेदीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हा एक्स्पो ग्राहकांना घर शोधण्यासाठी मदतीचा ठरला आहे,’’ ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला भेट देणाऱ्या एका पिंपरी चिंचवडकर दाम्पत्याची. शनिवार आणि रविवारी शहरातील असंख्य ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. परवडणाऱ्या गृहप्रकल्पांचे काहींनी ‘स्पॉट बुकिंग’ही केले. सुट्टीचे औचित्य साधून नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. शनिवारपासून (ता.२३) सुरू असलेल्या ‘सकाळ’च्या वास्तू एक्स्पोचा रविवारी (ता.२४) समारोप झाला.

स्वप्नांतील घर शोधताना आजच्या धावपळीच्या युगात सर्वसामान्यांची दमछाक होऊ नये, या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे ताथवडे सिल्व्हर हॉलमध्ये गृहविषयक ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आयोजित करण्यात आला होता. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशीही पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात वीसहून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सादर केलेले ‘महारेरा’ नोंदणीकृत १००हून अधिक उत्कृष्ट गृहप्रकल्प खरेदीदारांना पाहता आले. दिवसभरात फ्लॅट आणि प्लॉटचे स्पॉट बुकिंग यावेळी करण्यात आले.

या प्रदर्शनात शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह औंध बाणेर, वाकड, अशा विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पांची चौकशी खरेदीदारांना करता आली. तसेच हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, मामुर्डी या परिसरातील गृहप्रकल्पांचे विविध पर्यायही खरेदीदारांच्या पसंतीस उतरले. आयटीतील नोकरदारांना रावेत, किवळे, वाकड आणि हिंजवडी येथील गृहप्रकल्पांची माहिती घेता आली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घर साकारलेले आहे. प्रत्येक जणांनी आपल्या कुटूंबासमवेत प्रत्येक स्टॉलला भेट दिली. गृहप्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली. आपल्याला हव्या त्या परिसरात ‘टू बीएचके’ फ्लॅटपासून ते एखादे कार्यालय घेण्यापर्यंतचे उत्कृष्ट पर्याय उपलब्ध करून दिले होते. सोयीसुविधा, सुरक्षेची हमी आणि गुणवत्ता हे या गृहप्रकल्पांचे वैशिष्ट ठरले. रियल इस्टेटशी संबंधित होम लोनपासून फायनन्सपर्यंतच्या सर्व प्रश्नांबाबतच्या शंकांचे निरसनही येथे करण्यात आले.

ग्राहक म्हणतात....
आपल्या स्वप्नातील घर नागरिकांना साकार करता यावे, यासाठी काही वर्षांपासून वास्तू एक्स्पोचा स्तुत्य उपक्रम ‘सकाळ’ राबवित आहे, ही सर्वसामान्यांसाठी जमेची बाजू आहे. अशा ‘एक्स्पो’मधूनच मी यापूर्वी घर खरेदी केले आहे. या ‘एक्स्पोच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घर साकारले आहे. वाकड, किवळे या मध्यवर्ती ठिकाणांतील सगळेच गृहप्रोजेक्ट चांगले आहेत.
- सागर पाटील, मोशी

अनेक उत्कृष्ट गृहप्रकल्पांची शृंखला येथे पाहायला मिळाली. बहुतांशी बिल्डर्सनी चांगल्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. आम्हाला अपेक्षित रावेत, किवळे, मोशी या परिसरातील गृहप्रकल्पांची चांगली माहिती मिळाली. घरांच्या प्रदर्शनात विविध बिल्डर्सचे विविध प्रोजेक्ट असून, नागरिकांना एकाच छताखाली आपल्या स्वप्नातील घर निवडण्याची संधी मिळाली आहे.
- किरण चव्हाण, पिंपळे गुरव

या प्रदर्शनातील प्रकल्पांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. सामान्य नागरिकांना घर घेता येतील, असे प्रकल्प आहेत. साइट व्हिजिटची सोय उपयुक्त आहे. एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळाली. मला डुडुळगावातील ‘साईअंगण’चा प्रकल्प आवडला आहे.
- शैलेश गायकवाड, मोशी

‘सकाळ''च्या वास्तू प्रदर्शनामुळे खरोखर सर्वोत्तम गृहखरेदीचा पर्याय उपलब्ध होत आहे. अशा प्रदर्शनामुळे ग्राहकांची धावपळ थांबते आणि सर्व गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळते, हे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. या एक्स्पोच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी गृहखरेदीचा योग साधला आहे. मला बाणेरचा प्रोजेक्ट आवडला आहे.
- मिनल गवारे, चिंचवड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.