मोठी बातमी! मनोज जरांगेंना सर्वांत मोठा धक्का, आंदोलन करण्यास मनाई; समोर नवा पेच
Tv9 Marathi August 27, 2025 05:45 AM

Manoj Jarange Patil Mumbai Protest : येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीला घेऊन ते मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची सगळी तयारीदेखील झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे गणेशोत्सवाची मुंबईत धूम असताना मनोज जरांगे हेदेखील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत येणार आहेत. जरांगे यांनी आपले आंदोलन पुढे ढकलावे अशी असे आवाहन त्यांना केले जात आहे. जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. असे असतानाच आता त्यांना पहिला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने मनोज जरांगे यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिला आहे. जरांगे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार होते. जरांगे यांच्या याच आंदोलनाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दुसरी याचिका ही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती. या दोन्ही याचिकांच्या माध्यमातून जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करण्यात आला होता. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होणार आहे. हीच बाब लक्षात घेता मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दोन आठवड्यापर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. परवानगी द्यायचीच झाली तर मुंबईच्या बाहेर नवी मुंबई, ठाण्यासारख्या परिसरात एखाद्या ठिकाणी परवानगी देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच न्यायालयाने जरांगे यांनी शांततेत आंदोलन करावे, असेही म्हटले आहे.

जरांगे यांनी काय भूमिका घेतली?

न्यायालयाने मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिल्यानंतर जरांगे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली. त्यामुळेच न्यायालयाने असा निर्णय दिला. आमची टीम आता न्यायालयात जाणार आहे. आम्ही आमची बाजू मांडू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही शांततेत आमचे आंदोलन करू, अे सांगत देवेंद्र फडणवीस हे आडकाठी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना खडसावले

सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाहीत, अशा शब्दांत मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाची स्पष्ट भूमिका स्पष्ट केली. . सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचाही न्यायालयाने हवाला दिला. लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी, निदर्शने फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच केली पाहिजेत. मुंबईतील जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा द्यायची की नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.