इगतपुरी (नाशिक) : अनेक भागात आजही पक्के रस्ते झालेले नाहीत. यामुळे येथील नागरिकांना पायपीट करत जावे लागत असते. अशात पावसामुळे नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून वृद्ध महिलेला रुग्णालयात उपचाराला नेण्यासाठी खांद्यावर उचलून वाट काढावी लागल्याचे धक्कादायक वास्तव इगतपुरी तालुक्यात पाहण्यास मिळाले. +
नाशिकच्या इगतपुरीतालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी भागातील पार्वताबाई खतेले (वय ७०) हि वृद्ध महिला आजारी होती. यामुळे या वृद्धेला उपचारासाठी खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली. वाटेत असलेल्या कडवा नदीला पूर असल्याने नदी पार करून दोन व्यक्तींनी वृद्धेला खांद्यावर उचलून उपचारासाठी तीन किमीची पायपीट करत रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे नदीला असलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.
Crime News : परदेशात नोकरीच्या खोट्या प्रलोभनाचा पर्दाफाश; मनसेच्या हस्तक्षेपाने दोन तरुणांची सुटकारस्ता नसल्याने परिस्थिती उद्वभवली
रस्ता नसल्याने गुडघाभर पाण्यातून खांद्यावर उचलून नेण्यात आले. तर याच महिलेच्या उपचारासाठी तीन दिवस अगोदर एका डॉक्टराला नदी पार करून नेण्यात आलं होतं. मात्र महिलेच्या प्रकृतीची फरक न पडल्याने तिला खांद्यावर उचलून खाजगी रुग्णालयात नेण्याची वेळ आली. तर दोन गर्भवती महिलांना या समस्येमुळे प्रसूतीसाठी दुसऱ्या गावातील नातेवाईकांकडे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दर वर्षी पावसाळ्यात या भागात हीच परिस्थिती असते.
Washim : फवारणी करताना रानडुकराचा हल्ला; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यूपुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका
गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. रामकुंड परिसरात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण येथे अडकला होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.