- rat२६p३.jpg -
२५N८७१५०
ऐश्वर्या नागेश
ऐश्वर्या नागेश मालिकेत झळकली
चिपळूण, ता. २६ : शहरातील पेठमाप येथील ऐश्वर्या नागेश सध्या मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सखा माझा पांडुरंगमध्ये ‘यमुना’ ही भूमिका साकारत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती ही सातत्यपूर्ण भूमिका साकारत असून, प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडत आहे. या मालिकेचे प्रसारण दररोज संध्याकाळी ७.३० वाजता होत आहे . ऐश्वर्या हिने यापूर्वी झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत अभिनय केला आहे. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेसाठी मराठीतून सूत्रसंचालन करण्याची संधी तिला मिळाली होती.