मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी चलो मुंबईचा नारा जरी दिलेला असला तरी त्यांच्यावर अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. त्यांचे शिष्ठमंडळ मुंबईच्या आझाद मैदानातील जागेची पाहणी करायला गेले आहे. त्यांनी मुंबईच्या पोलीस उपायुक्तांची भेट देखील घेतली आहे. जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी अटी आणि शर्थी लावण्यात आलेल्या आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला आठ अटी घातल्या आहेत. यात त्यांना केवळ पाच वाहनांसह मुंबईत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच आझाद मैदानात केवळ एकच दिवस आंदोलन करण्याची अट घातली आहे.यावर जरांगे यांनी तुमच्या सर्व अटी पाळल्या जातील,परंतू एका दिवसाचं आंदोलन कसे शक्य आहे. मग तुम्ही एका दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले आहे.