Uttrakhand : 'स्वदेशी अपनाओ, राष्ट्र को आगे बढ़ाओ', मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा नारा; देहरादूनमध्ये आयोजित अभियानाचे नेतृत्व केले
esakal August 28, 2025 01:45 AM
Pushkar Singh Dhami Leads Swadeshi Campaign in Dehradun

स्वदेशी वस्तू खरेदी केल्या तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो, याची जाणिव लोकांना करून देण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज देहरादूनच्या पलटन बाजारात आयोजित ‘स्वदेशी अपनाओ, राष्ट्र को आगे बढ़ाओ’ या जनजागृती अभियानाचे नेतृत्व केले. या वेळी त्यांनी स्थानिक व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना अधिकाधिक प्रमाणात स्वदेशी उत्पादने वापरण्यासाठी प्रेरित केले.

Uttarakhand Cloudburst: कधी ढगफुटी तर कधी भूस्खलन... उत्तराखंड का उजडतोय? ही प्रलयाची नांदी आहे का?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व वोकल फॉर लोकल या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहचवण्याचा एक प्रभावी प्रयत्न आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा आपण आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देतो, तेव्हा देशाची आर्थिक स्थिती आणि स्थानिक रोजगार दोन्ही मजबूत होतात.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, स्वदेशीचा स्वीकार हा केवळ आर्थिक निर्णय नाही, तर एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. पंतप्रधानांनी दिलेला “स्वदेशी अपनाओ, देश को मजबूत बनाओ” हा मंत्र अंगीकारल्यास आपण देशाची अर्थव्यवस्था बळकट करू शकतो आणि स्थानिक उत्पादक, कारागीर व लघुउद्योगांना आत्मनिर्भर बनवू शकतो.

मुख्यमंत्री धामी यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले की त्यांनी आपल्या दुकानदारावर स्वदेशी फलक लावावेत, जेणेकरून ग्राहकांमध्ये स्वदेशी वस्तूंविषयी विश्वास व अभिमान निर्माण होईल. त्यांनी असेही सांगितले की, “स्वदेशी वस्तू वापरण्यामुळे आपल्या देशातील पैसा देशातच राहील आणि भारत जागतिक पातळीवर अधिक सामर्थ्यवान देश म्हणून उदयास येईल.”

Uttarakhand : महिलांनी स्वयंरोजगार करावा यासाठी उत्तराखंड सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; दोन लाखांच्या कर्जावर मिळतेय इतके अनुदान

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पलटन बाजारातील दुकाने भेट देऊन "स्वदेशी अपनाओ, राष्ट्र को मजबूत बनाओ" या आशयाचे स्टिकर्स लावले. त्यांनी लोकांना सण-उत्सव, भेटवस्तू आणि दैनंदिन गरजांमध्ये स्वदेशी पर्यायांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही केवळ एक प्रेरणादायक उपक्रम ठरणार नसून आपली सांस्कृतिक ओळख व आत्मनिर्भर भारताचा संकल्प यांना अधिक बळकटी देणारी ठरेल.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनप्रतिनिधींनी, व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी मिळून स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत सहभागी होण्याचा संकल्प केला आणि मुख्यमंत्र्यांना आपला पूर्ण पाठिंबा दिला.

या कार्यक्रमात स्थानिक युवक, व्यापारी व सामाजिक संस्थांचीही सक्रीय सहभागिता दिसून आली. उपस्थित जनसमुदायाने "स्वदेशी अपनाओ – देश बचाओ" अशा घोषणांनी अभियानाला पाठिंबा दर्शवला.

या वेळी राज्यसभा खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट तसेच इतर जनप्रतिनिधी, स्थानिक व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.