मालेगाव: शहरातील खासगी वीज वितरण कंपनीच्या २८ वर्षीय कर्मचाऱ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
आयेशानगर येथील शेख सुल्तान शेख अक्रम (वय २८) याने तक्रारदाराच्या देवीचा मळा भागातील सर्व्हे क्र. २६०, प्लॉट क्र. २२ येथील पत्र्याच्या गोदामासाठी नवीन औद्योगिक मीटर बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तक्रारदाराकडे विज चोरीची १ लाख २६ हजार ३२४ रुपयांची बाकी रक्कम होती.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला ४० हजार रुपये भरण्याच्या अटीवर नवीन मीटर बसविण्याची माहिती दिली होती. याचा गैरफायदा घेत सुलतानने तक्रारदाराकडून ८० हजार रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर तक्रारदाराने ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी सापळा रचून लाचलुचपत विभागाने सुलतानला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.
Onion Export India: श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले; भारतीय कांदा निर्यातदारांना फटकाया कारवाईत पोलिस निरीक्षक सुवर्णा हांडोरे, हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस नाईक विलास निकम, पोलिस शिपाई परशुराम गायकवाड यांनी सहभाग घेतला. संशियाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.