-प्रमिला चोरगी
सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचा पदावरून हटविण्याच्या हालचालींना अचानक वेग आला आहे. त्यांच्या निवडीला चार महिने पूर्ण होण्याआधीच विरोधकांकडून वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. संचालक मंडळाच्या बैठकांना गैरहजर राहिलेल्या संचालकांनी स्वतंत्र बैठका सुरू केल्या आहेत. दिलीप माने यांचे नेतृत्व अमान्य असल्याचा सुर आळवणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्येही विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगू लागली आहे.
Manohar Sapate: मराठा समाजाची संस्था संपविण्याचा आमदार कोठेंचा डाव; मनोहर सपाटे यांचा आरोप, सत्तेचा गैरवापर करून प्रशासक नेमण्यासाठी दिले पत्रगेल्या पंधरा वर्षांपासून माने यांना राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सुरुवातीला काँग्रेस पक्षाने त्यांचे राजकीय पंख छाटले. त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर आले. अथक प्रयत्नानंतर त्यांच्या पदरी बाजार समिती सभापतिपद आले. हे पद नशिबी येऊन चार महिने होत नाही, तोपर्यंत खुर्ची डळमळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पुढे आले आहे.
तर खेळ खल्लास
आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बळिराम साठे यांनी मनात आणले तर मानेंचा बाजार उठवू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दोन्ही देशमुखांत तासभर चर्चा
२८ एप्रिल रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. ११ मेला सभापती निवड झाली. नियमानुसार निवडीनंतर सहा महिने सभापतींवर अविश्वास ठराव आणता येत नाही. आठ दिवसांपूर्वी सहा संचालकांची बैठक झाली. मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना घरी बोलाविले. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही देशमुखांनी या विषयाला दुजोरा देत शहर विकासासाठी एकत्रित आल्याचे सांगितले. तरीही नेमकी बैठक कशाची? याबाबत मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता तर विरोधकांना चिंता लागून राहिली आहे.
अशी जमवाजमव शक्य
आमदार सुभाष देशमुख यांच्या गटातील मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड हे तीन संचालक, सुरेश हसापुरे यांच्या गटातील सुरेश हसापुरे, सुरेश पाटोळे, उदय पाटील हे तीन संचालक तर विजयकुमार देशमुख यांच्या मर्जीतील श्रीशैल नरोळे, वैभव बरबडे व अन्य एक संचालक, तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत देशमुखांच्या विरोधात असलेले राजशेखर शिवदारे हे सुभाष देशमुखांच्या सोबत आहेत. त्यामुळे बाजार समितीचे संचालक सभापती बदलासाठी आवश्यक संख्याबळ तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Ganesh festival:'मुंबईतील आंदोलनात हजारो मराठे होणार सहभागी'; साेलापूर जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू, बार्शीतून जाणार दोन हजारांपेक्षा जास्त वाहने असंतुष्ट संचालक म्हणतात..सभापती हे संचालकांना विश्वासात घेत नाहीत
बाजार समितीत हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू
बाजार समितीमधील माहिती दडविण्यात येते
कर्मचाऱ्यांवर दबाव गट निर्माण करण्यासाठी मर्जी मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती