नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानी आज सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले. रुग्णालय बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात हे छापे घालण्यात आले. या प्रकरणात भारद्वाज आणि सत्येंद्र जैन या माजी मंत्र्यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या कारवाईनंतर आप नेत्यांनी टीकास्त्र सोडत केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.
आप सरकारच्या कार्यकाळात २०१८-१९ मध्ये दिल्ली सरकारने २४ रुग्णालयांच्या बांधकामासाठी ५,५९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. सहा महिन्यात आयसीयू रुग्णालय उभारणे अपेक्षित असताना तीन वर्ष उलटल्यानंतरही काम अपूर्ण राहिले. यातील बऱ्याच प्रकल्पांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारद्वाज यांच्या निवासस्थानी आज ईडीने छापे घातले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कारवाईवर कडाडून टीका केली. ‘‘भारद्वाज यांच्या घरी छापे हे मोदी सरकारकडून तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आणखी एक उदाहरण आहे. चुकीच्या धोरणांविरुद्ध तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविल्याने ‘आप’ला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. मात्र, अशा छाप्यांनी भाजप आपला घाबरवू शकत नाही,’’ असा इशारा केजरीवाल यांनी दिला.
राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही सौरभ भारद्वाज यांच्या विरोधातील खटला खोटा आणि निराधार असल्याचे सांगताना, हा खटला दाखल झाला तेव्हा भारद्वाज मंत्रीही नव्हते, असा दावा केला. आप नेत्यांविरुद्ध खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकणे हे मोदी सरकारचे धोरण असून मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावरून चर्चा होऊ नये यासाठी ईडीला पुढे केले आहे, असा टोला संजयसिंह यांनी लगावला.
Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा इशारा: भारतीय नौदल फक्त समुद्राचे नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचे मुख्य आधार आहे आतिशी यांची टीकादिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या व माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीही पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावरून लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच हे छापे घालण्यात आल्याचा दावा केला. आपच्या सर्व नेत्यांवर राजकीय आकसातून खोटे खटले लादले आहेत, अशीही टीका आतिशी यांनी केली.