विशाखापट्टण : ‘‘भारतीय नौदलाची भूमिका ही केवळ समुद्राच्या संरक्षणापुरती मर्यादित नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचा देखील तो सर्वांत मोठा आधार आहे. देशाच्या इंधनसाठ्याचे संरक्षण करण्याचे काम हे नौदलाकडूनच करण्यात येते,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले.
ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना त्यांनी आपण पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या दोन बहुउद्देशीय युद्धनौका नौदलामध्ये सामील झाल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते.
‘‘भारत हा विस्तारवादी मानसिकतेचा देश नाही. सगळ्या जगाला हे ठावूक आहे. आम्ही कधीच सर्वप्रथम अन्य देशावर हल्ला केलेला नाही. भारताला जेव्हा धक्का लागतो, तेव्हा मात्र त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे हे आम्हाला चांगलेच ठावूक आहे,’’ असेही राजनाथ यांनी सांगितले.
Dinosaur Fossil Discovery in Jaisalmer: राजस्थानात डायनॉसोरच्या खुणा; जैसलमेरजवळ आढळली सांगाडासदृश रचना अन् ठसे‘‘ भू-रणनितीक परिस्थितीचा थेट देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो. याच भागामध्ये आमचे इंधन साठे असून त्यांच्या संरक्षणाचे काम आमचे नौदल करते. दोन नव्या युद्धनौकांमुळे देशाच्या नाविक सामर्थ्यामध्ये भर पडेल. संरक्षणातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. दोन्ही युद्धनौका या देशाच्या लष्करी सामर्थ्याचा महत्त्वाचा घटक ठरतील,’’ असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.