28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, सात राज्यात अलर्ट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
Tv9 Marathi August 28, 2025 04:45 PM

मागच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता परत एकदा भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय. थेट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी असणार आहे. मात्र, प्रत्यक्षात जोरदार पाऊस होताना दिसतोय. आता गणपती आगमनानंतर पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. आज भारतीय हवामान विभागाकडून मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच सकाळीच मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

देशात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, गोवा, महाराष्ट्र, ओडिसा भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच आसाम, मेघालय, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू या भागात पाऊस होईल. 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा, कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथा, पालघर, कोकण. रायगड, रत्नागरी, नाशिक, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, भंडारा, नांदेड, गोदिंया गडचिरोली, चंद्रपूर या भागात जोरदार पाऊस होणार आहे.

नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सवावर पावसाचे सावट बघायला मिळतंय. उद्या आणि परवा नाशिकमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98% टक्के भरले आहे. जिल्ह्यातले बारा धरण 100 टक्के भरले. धरण पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणातून 3025 क्यूसेक् पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. परळी आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर रात्रीपासून परळी तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. रिमझिम पावसामुळे रबीच्या पिकांना फायदा होणार आहे आणि नागरिकांनाही उकड्यापासून चांगला दिलासा मिळाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.