सातारा : दुर्गम भागास जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६७ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक १९ शाळांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना सुस्थितीत इमारतींमध्ये शिक्षण मिळणार आहे.
Maratha Reservation: 'मराठा समाजाचा मोर्चा आज नगरमध्ये धडकणार'; चौकाचौकांत होणार स्वागत, जिल्ह्यातून दहा हजार वाहने जाणारजिल्हा परिषदेच्या काही धोकादायक स्थितीतील शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये शाळांची पडझडही झाली आहे, तसेच अनेक शाळांमध्ये भिंतींना भेगा पडणे, पत्रा गंजणे, खिडक्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी गळणे अशी स्थिती आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करत शिक्षण घ्यावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीचा विचार करून धोकादायक शाळांचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर या शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या व सुस्थितीत असणाऱ्या शाळेत शिक्षण घेता येणार आहे. शाळांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या आहेत, तसेच हे काम ३१ मार्च २०२७ या दोन वर्षांत पूर्ण करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.
इथंच शिकावं लागतं सरस्वतीच्या बाळापडकी शाळा, गळकं छप्पर, इथंच शिकावं लागतं सरस्वतीच्या बाळा या प्रकारची स्थिती जिल्ह्याच्या अनेक भागांत यापूर्वीही अनुभवास आलेली आहे. विशेषत: दुर्गम, डोंगराळ भागात विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावं लागायचं; परंतु जेव्हा शाळांच्या रंगरंगोटीसह पुननिर्माणासाठी लोकसहभाग मिळू लागला, तेव्हापासून यामध्ये सकारात्मक बदल दिसू लागला. गावांनी पुढाकार घेत शाळांचे पुनरुज्जीवन केल्याची अनेक उदाहरणे आहेत, तरीही आज अनेक ठिकाणी अशा मदतीची गरज आहे. अशा स्थितीत शासनाने या स्थितीकडे गंभीरपणाने लक्ष देणेही तितकेच गरजेचे ठरत आहे.
Satara fraud: 'सायबर फसवणुकीतील ९१ हजारांची रक्कम परत';रहिमतपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक या शाळांची होणार दुरुस्तीजिल्हा परिषद शाळा खंडाळा, शिंदेवाडी, शिरवळ (ता. खंडाळा)
दरुज, पडळ
(ता. खटाव)
ल्हासुर्णे, एकंबे
(ता. कोरेगाव)
बरड, हिंगणगाव, चौधरवाडी
(ता. फलटण)
बोपर्डी (ता. वाई),
मेटगुताड, राजापुरी
(ता. महाबळेश्वर),
अपशिंगे, कोडोली
(ता. सातारा),
कोडोली (ता. कऱ्हाड),
ढेबेवाडी (ता. पाटण),
आंधळी, राजवडी
(ता. माण)