पराग ढोबळे
नागपूर : साधारण महिनाभरापूर्वी शेतीवरून वाद झाला होता. या झालेल्या वादाचा राग मनात धरून दुचाकीने जात असलेल्या इसमाला कारने धडक देत उडविले. इतक्यावर न थांबता खाली पडलेल्या इसमावर तलवारीने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या पारशवीनीत घडली आहे. यात सदर इसम गंभीर जखमी झाला आहे.
नागपूरजिल्ह्यातील पारशीवनीच्या ग्रामीण रुग्णालय जवळ सदरची घटना घडली आहे. या घटनेत लालू आसाराम एकनाथ (वय ४६) असे जखमीचे नाव आहे. तर लालू राणु भोयर (वय ३५) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान लालू एकनाथ आणि लालू भोयर या दोघांमध्ये शेतातील पाणी अडवण्यावरून साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. हे वाद तेथेच मिटला होता. मात्र या वादाचा राग लालू भोयर याच्या मनात होता.
Nagpur : खेळत असताना खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा जीव; पाण्यात बुडून मृत्यूदुचाकीला धडक देत जीवघेणा हल्ला
अशातच मंगळवारी लालू एकनाथ हा आपल्या दुचाकी पारशिवनी ते सावनेर मार्गाने आपल्या घरी जात होता. याच वेळी लालू भोयर ह्याने कारने मागून लालू एकनाथ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार लालू एकनाथ खाली पडला. त्यानंतर लालू भोयरने गाडीतुन तलवारी काढत दुचाकीवरून खाली पडलेल्या लालु एकनाथ याच्यावर सपासप वार केले.
Bhamragad Flood : भामरागडात पूरस्थिती; छत्तीसगढमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम, शंभर गावांचा संपर्क तुटलाहल्लेखोरास घेतले ताब्यात
दुचाकीवरून पडल्याने आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात लालू एकनाथ गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीसघटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमीस नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविले. तसेच पारशीवनी पोलिसांनी आरोपी लालू भोयरला अटक केली असून तलवार आणि गाडी जप्त करत पुढील तपास सुरू केला.