Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील जुन्नर शहरात दाखल
Saam TV August 28, 2025 08:45 PM
Amravati: दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये उभारले जाणार स्वयंचलित हवामान केंद्र

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये उभारले जाणार स्वयंचलित हवामान केंद्र

हवामान केंद्रामुळे नैसर्गिक आपत्ती झालेल नुकसान व हवामान विषयक अचूक माहिती मिळणार

केंद्र सरकारच्या विडस या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार

आपत्ती, भूकंप ,पूर गारपीट, ढगफुटी याची पूर्व माहिती मिळणार.

Nagpur: नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याची 23 लाखांनी फसवणूक

नागपूर -

- नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांनी फसवणूक

- पेठे यांच्या खात्यातील परस्पर शेअर अन्य खात्यात वळते करून केली फसवणूक

- याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी नंदन ओमप्रकाश गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय

- ठकबाजाचे मध्यप्रदेशच्या थार जिल्ह्यातील सरदारपूर येथील रहिवासी आहे

Pune: मनोज जरांगे पाटील जुन्नर शहरात दाखल, आज मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार

मनोज जरांगे पाटील जुन्नर शहरात दाखल झालेत

जुन्नरमधील वनविभागाच्या गेस्ट हाऊसला पोहोचले

काही वेळ गेस्ट हाऊसला विश्रांती घेणार

त्यानंतर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन माती कपाळी लावणार

मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प करणार आहेत.

यानंतर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.