पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे तीन आतंकवादी नेपाळ मार्गे भारतात घुसले आहेत. बिहार पोलिस मुख्यालयाने या तिन्ही दशतवाद्यांची फोटो आणि नाव जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील बहावलपुरचा रहिवासी मोहम्मद उस्मान, उमरकोटचा रहिवासी आदिल हुसैन, रावलपिंडीचा रहिवासी हसनैन अली अवान अशी तिघांची नावे आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे तिघेही काठमांडू पोहोचले होते. त्यानंतर ते बिहार मार्गे भारतात घुसले आहेत.
हे तिघेही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे दहशतवादी आहेत. सध्या बिहारसोबतच संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे तर महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या आगमन झाले आहे. तिन्ही दहशतवादी हे मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आल्याची माहिती मिळत आहे. सध्या या तिन्ही दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. तिघांचेही फोटो व्हायरल करण्यात आली आहेत, सोबतच हे कुठेही दिसली तर संपर्क करण्यासाठी काही नंबर देखील जारी करण्यात आली आहेत.
पहलगामवरील हल्ल्याच्या जखमा अजून भरलेल्या नसतानाचा आता परत पाकिस्तानातून तीन दहशतवादी भारतात दाखल झाली आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणात अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळतंय. सर्च ऑपरेशन जारी असल्याचीही माहिती मिळतंय. तपास यंत्रणांना काहीही करून या तिघा दहशतावाद्यांना ताब्यात घ्यायचे आहे. हे तिघेही पाकिस्तानातून भारतात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आले आहेत. पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक भारतीयांचे जीवे गेले.
फक्त हेच नाही तर दहशतवाद्यांनी चक्क धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. पाकिस्तानातून तीन दहशतवादी हे नेपाळ मार्गे भारतात घुसल्याचे कळताच सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर नेपाळ सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आले. हेच नाही तर भारताकडून दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आले. मात्र, नेपाळ मार्गे तीन दहशतवादी हे भारतात आल्याने खळबळ उडाली आहे. देशात सध्या सणासुदीचे वातावरण बघायला मिळते.