जीमेल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे
पण अनावश्यक मेलने तुमचे स्टोरेज भरून जाते
आता हे नकोसे ईमेल एका झटक्यात डिलीट करण्याची सोपी ट्रिक सापडली आहे
Email Delete Step By Step Process : तुमचं जीमेल इनबॉक्स जाहिराती, न्यूजलेटर्स आणि अनावश्यक ईमेल्सनी भरलंय का? गुगलच्या 15GB मोफत स्टोरेजसंपले आहे? काळजी कशाला करताय? आता एक-एक ईमेल डिलीट करण्याऐवजी काही सोप्या ट्रिकनी तुम्ही जास्तीत जास्त ईमेल्स हटवू शकता. जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोजसाठी मिळणारं 15GB स्टोरेज लवकर भरतं विशेषतः जाहिरात ईमेल्स, रिसीट आणि न्यूजलेटर्समुळे. यामुळे महत्त्वाचे ईमेल्स मिळण्यात अडथळा येऊ शकतो. पण काही मिनिटांतच तुम्ही तुमचं इनबॉक्स क्लीन करू शकता
जाहिरातींचे ईमेल्स
जीमेल उघडा आणि इनबॉक्समध्ये जा. सर्च बारमध्ये ‘Unsubscribe’ टाइप करा आणि एंटर दाबा. यामुळे सर्व जाहिरात आणि सबस्क्रिप्शन ईमेल्स दिसतील.
वरच्या डाव्या कोपऱ्यातील चेकबॉक्स निवडून सर्व ईमेल्स सिलेक्ट करा आणि ट्रॅश आयकॉनवर क्लिक करा.
जर ‘Select all conversations that match this search’ हा पर्याय दिसला, तर त्यावर क्लिक करून सर्व संबंधित ईमेल्स एकाच वेळी डिलीट करा.
याच पद्धतीने ‘Promotions’ किंवा ‘Social’ टॅबमधील ईमेल्सही हटवू शकता.
विशिष्ट व्यक्ती किंवा कालावधीतील ईमेल्स
विशिष्ट व्यक्तीकडून आलेले ईमेल्स हटवायचे असतील तर सर्च बारमध्ये ‘from:email_address’ टाइप करा. उदाहरणार्थ, ‘from:example@company.com’.
तसेच विशिष्ट कालावधीतील ईमेल्स हटवण्यासाठी ‘after:2023-11-01’ किंवा ‘before:2023-01-01’ असे सर्च करा. यानंतर सर्व निवडलेले ईमेल्स ट्रॅशमध्ये पाठवा.
चुकीचे डिलीट झाल्यास काय करावे?
चुकून महत्त्वाचा ईमेल डिलीट झाला असेल तर घाबरू नका. ट्रॅश फोल्डरमध्ये डिलीट केलेले ईमेल्स 30 दिवसांपर्यंत राहतात. मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबवरून ट्रॅश फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ते सहज रीकवर करू शकता. या सोप्या पद्धतींनी तुमचं जीमेल इनबॉक्स व्यवस्थित ठेवा आणि स्टोरेजच्या चिंतेला बायबाय म्हणा
How can I delete promotional emails in bulk from Gmail?
जीमेलमधील जाहिरातींचे ईमेल्स मोठ्या संख्येने कसे डिलीट करू शकतो?
जीमेल उघडा, सर्च बारमध्ये ‘Unsubscribe’ टाइप करा, सर्व ईमेल्स निवडा आणि ट्रॅश आयकॉनवर क्लिक करा.
Can I recover emails deleted by mistake?
चुकून डिलीट केलेले ईमेल्स परत मिळवता येतील का?
होय, ट्रॅश फोल्डरमध्ये ३० दिवसांपर्यंत ईमेल्स राहतात; तिथून तुम्ही ते पुनर्स्थापित करू शकता.
How do I delete emails from a specific sender?
विशिष्ट व्यक्तीकडून आलेले ईमेल्स कसे डिलीट करू?
सर्च बारमध्ये ‘from:email_address’ टाइप करा, ईमेल्स निवडा आणि ट्रॅशमध्ये पाठवा.
How can I free up Gmail storage quickly?
जीमेल स्टोरेज जलद कसे मोकळे करू?
‘Promotions’ किंवा ‘Social’ टॅबमधील ईमेल्स ‘Unsubscribe’ सर्च करून किंवा विशिष्ट कालावधीतील ईमेल्स डिलीट करून स्टोरेज मोकळे करा.
Is it possible to delete emails older than a specific date?
विशिष्ट तारखेपूर्वीचे ईमेल्स डिलीट करणे शक्य आहे का?
होय, सर्च बारमध्ये ‘before:YYYY-MM-DD’ टाइप करा, ईमेल्स निवडा आणि डिलीट करा.