ईपीएफओ लवकरच ईपीएफओ 3.0 नावाचे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार असून यामुळे 8 कोटींपेक्षा जास्त सदस्यांना फायदा होणार आहे.
सदस्यांना एटीएम व यूपीआयद्वारे थेट पीएफ रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे.
तसेच ऑनलाईन क्लेम अपडेट व मोबाईलवर सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत.
EPFO 3.0: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) देशातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे. सध्या 8 कोटींपेक्षा जास्त कामगार व कर्मचारी ईपीएफओशी जोडलेले आहेत. आता या सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ईपीएफओ लवकरच ईपीएफओ 3.0 नावाचे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार असून, यातून सदस्यांना अनेक फायदे मिळणार आहेत.
या प्रकल्पासाठी इन्फोसिस, विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांसारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जून 2025 पर्यंत हा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा प्लॅन होता, मात्र काही तांत्रिक कारणास्तव थोडा उशीर झाला असून, आता 2025च्या उत्तरार्धात हा प्लॅटफॉर्म सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
नवीन प्लॅटफॉर्ममुळे होणारे 5 मोठे बदल1. एटीएममधून थेट पैसे काढण्याची सुविधा
आजवर पीएफची रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम करावा लागत असे आणि त्यावर प्रक्रिया होण्यासाठी काही दिवस लागायचे. पण आता नव्या सुविधेमुळे सदस्यांना थेट एटीएम मशीनमधूनच त्यांच्या खात्यातील पीएफची रक्कम मिळणार आहे. यासाठी केवळ युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि आधार व बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
2. यूपीआयद्वारे रक्कम काढण्याची सोयआज भारतात यूपीआय पेमेंट सर्वाधिक लोकप्रिय झाले आहे. त्याचा फायदा ईपीएफओ सदस्यांनाही मिळणार आहे. नवीन प्लॅटफॉर्मवरून यूपीआय ॲप्सच्या मदतीने थेट पीएफचीरक्कम ट्रान्सफर करता येईल. यामुळे क्लेम करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
3. ऑनलाईन क्लेम अपडेट व माहिती दुरुस्त करणेयापुढे खात्यातील नाव, जन्मतारीख यांसारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी ईपीएफओ कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. फक्त ओटीपी व्हेरिफिकेशनद्वारे ऑनलाईन बदल करता येतील. तसेच आपल्या क्लेमची सद्यस्थिती देखील थेट मोबाईलवर पाहता येईल.
4. मृत्यू झाल्यास क्लेमची प्रक्रिया सोपी होणारआत्तापर्यंत सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना क्लेम मिळवताना अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः अल्पवयीन वारस असल्यास गार्डियनशिप सर्टिफिकेट आवश्यक असायचे.
पण आता नव्या प्रणालीमुळे ती गरज राहणार नाही आणि कुटुंबीयांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल.
ईपीएफओ3.0 हा पूर्णपणे मोबाईल-फ्रेंडली प्लॅटफॉर्म असेल. यामुळे सदस्यांना कुठेही, कधीही त्यांच्या खात्यातील रक्कम, व्याजाची माहिती व क्लेमची स्थिती पाहता येईल. ही सिस्टम अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यात येणार आहे.
Most Expensive Metal: जगातील सर्वात महागडा धातू कोणता? किंमत इतकी जास्त की सोनं-चांदीही स्वस्त वाटेल FAQs1. ईपीएफओ 3.0 म्हणजे काय?
(What is EPFO 3.0?)
- ईपीएफओ 3.0 हा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे सदस्यांना आपले पीएफ खाते अधिक सोप्या पद्धतीने वापरता येईल.
2. एटीएममधून पैसे कसे काढता येतील?
(How can money be withdrawn from ATMs?)
- यासाठी सदस्याने आपला UAN सक्रिय करणे आणि आधार बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतर एटीएमद्वारे थेट पैसे काढता येतील.
3. यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा कशी असेल?
(How will the UPI withdrawal facility work?)
- सदस्य आपला पीएफ यूपीआय ॲपशी जोडू शकतील आणि गरजेप्रमाणे लगेच पैसे ट्रान्सफर करू शकतील.
4. खात्यातील माहिती दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल?
(How can members update their account details?)
- नाव, जन्मतारीख यांसारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन ओटीपी व्हेरिफिकेशन प्रक्रिया वापरता येईल.
5. मृत्यू क्लेम प्रक्रियेत काय बदल होणार आहेत?
(What changes will happen in the death claim process?)
- सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना क्लेम करताना अल्पवयीन असल्यास गार्डियनशिप सर्टिफिकेटची आवश्यकता राहणार नाही, त्यामुळे प्रक्रिया सोपी होईल.