KCL 2025 : 6,6,6,6,6,4,4,4,4, आशिया कपआधी संजू जोरात, आणखी एक स्फोटक खेळी
Tv9 Marathi August 29, 2025 07:45 AM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टी 20i संघात बीसीसीआय निवड समितीने शुबमन गिल याचा समावेश केला. शुबमन ओपनर आहे. शुबमनने अनेकदा तिन्ही फॉर्मेटमध्ये सलामीला खेळला आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे आशिया कप स्पर्धेत नियमित विकेटकीपर आणि बॅट्समन संजू सॅमसन याच्या स्थानात बदल करण्यात येणार असल्याची चर्चा रंगलीय. तर दुसऱ्या बाजूला संजूने आशिया कपआधी केरळ क्रिकेट लीग 2025 स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केलीय. संजूने या तिन्ही सामन्यात ओपनर म्हणून ही कामगिरी केलीय. त्यामुळे शुबमनसाठी संजूच्या बॅटिंग स्थानात बदल करायचा की नाही? असा प्रश्न टीम मॅनेजमेंट समोर असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

संजू केसीएल स्पर्धेत (KCL 2025) कोची ब्लू टायगर्स टीमकडून खेळतोय. संजूने या स्पर्धेत सलग तिसरं अर्धशतक झळकावत धमाका केलाय. संजूने 28 ऑगस्टला अदाणी त्रिवेंद्रम रॉयल्स विरुद्ध स्फोटक अर्धशतकी खेळी साकारली. संजूने फटकेबाजीनेच सुरुवात केली. तसेच दुसऱ्या बाजूने संजूचा ओपनर सहकारी व्ही मनोहरन यानेही टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. या सलामी जोडीने 68 धावांची भागीदारी केली. मनोहरन 26 बॉलमध्ये 42 रन्स करुन आऊट झाला. तर दुसऱ्या बाजूला संजूची फटकेबाजी सुरुच होती.

संजूने फक्त 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. संजूने डावातील 12 व्या ओव्हरमध्ये 2 सिक्स खेचले. तसेच 1 धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. संजूने अर्धशतकानंतरही तडाखा सुरुच ठेवला. मात्र संजूला अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. संजू 15 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. संजूने 37 बॉलमध्ये 62 रन्स केल्या. संजूने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. संजूने 5 षटकार आणि 4 चौकार लगावले.

सलग तिसऱ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा

संजूने यासह 5 दिवसात सलग तिसऱ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या. संजूने रविवारी आमि मंगळवारी मोठी खेळी केली. संजू सॅमसन याने रविवारी 24 ऑगस्टला शतक ठोकलं. संजूने तेव्हा 121 धावांची खेळी केली. तर मंगळवारी 26 ऑगस्टला 89 धावा केल्या.

टीम मॅनेजेमेंट काय निर्णय घेणार?

दरम्यान संजू भारतासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने ओपनर म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. संजूने हाच धमाका केसीएल लीग स्पर्धेतही कायम ठेवलाय. त्यामुळे टीम मॅनेजमेंट यानंतरही संजूच्या बॅटिंग क्रमवारीत बदल करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.