RIL शेअर्स फोकसमध्ये! एजीएममध्ये Mukesh Ambani यांच्या संबोधनाकडे बाजाराचे लक्ष
ET Marathi August 29, 2025 07:45 AM
मुंबई : अमेरिकी टॅरिफच्या अंमलबजावणीनंतर आजही भारतीय शेअर बाजारांवर दबाव दिसून येत आहे. अशातच काही शेअर्स आपल्या कॉर्पोरेट अपडेट्सच्या आधारावर गुंतवणुकदारांच्या रडावर आहेत. बाजारात सर्वाधिक बाजार भांडवल असलेली रिलायन्सच्या शेअर्सवर आज गुंतवणुकदारांचा फोकस आहे. कारण उद्या म्हणजेच शुक्रवारी, 29 ऑगस्ट रोजी RIL कंपनीची 48 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) पार पडणार आहे. यामध्ये रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी सुमारे 44 लाख भागधारकांना संबोधित करतील. सध्या सुरू असलेला जागतिक भूराजकीय तणाव आणि अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ शुल्काच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी काय बोलतात याकडे अर्थजगताचे लक्ष असणार आहे.



भारतीय निर्यातीवर सध्या अमेरिकी टॅरिफचं संकट घोंगावत आहे. यामुळे काही क्षेत्रांना फटका बसू शकतो. परंतू सरकारदेखील टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. मुळात अमेरिकी टॅरिफचे कारण रशियातून भारतात आयात होणाऱ्या तेलामुळे असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे. या तेलाचा देशातील सर्वात मोठी खरेदीदार कंपनी रिलायन्स आहे. त्यामुळे Mukesh Ambani याबाबत गुंतवणुकदारांना काय संबोधतात. हे पाहणं महत्वाचं ठरेल. विशेष म्हणजे गुंतवणुकदारांची नजर जिओ आयपीओवर सुद्धा असणार आहे. या आयपीओबाबत बाजारात अनेक भाकितं वर्तवली जात आहेत. स्वतः अंबानीच आता या आयपीओबाबत काय माहिती देतात. हे पाहणं महत्वाचं ठरेल.



दरम्यान, रिलायन्सच्या एजीएम आधी विविध ब्रोकरेज हाऊस शेअर्सबाबत सकारात्मक दिसून येत आहेत. रिलायन्सचा शेअर आज 1,383 रुपयांवर व्यवहार करीत आहे.



कोणत्या ब्रोकरेज फर्मचे रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुक काय मत आहे याबाबत माहिती घेऊ.



ब्रोकरेज रेटींग लक्ष्य किंमत (₹)



सिएलएसए (CLSA) Outperform 1,650
जेफरीज (Jefferies) Buy 1,670
युबीएस (UBS) Buy 1,750
सीएलएसएने रिलायन्सला Outperform रेटिंग दिली असून लक्ष्य किंमत 1,650 रुपये ठेवले आहे, जे सध्याच्या शेअर प्राइसपेक्षा सुमारे 17% जास्त आहे. CLSA च्या मते, Jio चा EBITDA दरवर्षी 15% वाढत आहे, आणि कॅपेक्स कमी झाल्याने फ्री कॅश फ्लोमध्ये तीनपट वाढ झाली आहे. AI प्रोजेक्ट JioBrain आणि AirFiber कनेक्शनमुळे भविष्यातील वाढीची शक्यता अधिक आहे.



जेफरीजनेही Buy सल्ला दिला असून लक्ष्य किंमत 1,670 रुपये निश्चित केली आहे. त्यांनी म्हटले की Jio आणि Retail व्यवसायांमध्ये खर्चात सुधारणा झाली आहे आणि जिओचा FCF पॉझिटिव्ह आहे. कंपनी आता होम ब्रॉडबँड, एंटरप्राइज सोल्युशन्स आणि FMCG क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.



युबीएसने देखील रिलायन्सवर ‘Buy’ रेटिंग दिली असून पुढील 12 महिन्यांसाठी लक्ष्य किंमत 1,750 रुपये दिले आहे. त्यांच्यानुसार रिलायन्स भारतातील डिजिटल आणि नव्या ऊर्जा क्षेत्रात मजबूत स्थितीत आहे. येत्या 12–18 महिन्यांत कंपनीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.



(Disclaimer : ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.