Solapur News: साेलापूर नगरपरिषदेसाठी मंगळवेढ्यातून २०, बार्शीतून ८ हरकती; नगराध्यक्षांच्या आरक्षणाचा घेतला जातोय कानोसा
esakal August 29, 2025 09:45 AM

-प्रमोद बोडके

सोलापूर: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीची नियमावली प्रसिद्ध झाली. जिल्हा परिषदेच्या पाठोपाठ आता नगरपरिषदांच्या निवडणुकांचीही प्रक्रिया वेग धरू लागली आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचनेवर सध्या हरकती स्वीकारल्या जात आहे. या प्रभागरचनेवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून आलेल्या ४१ हकरतींमध्ये एकट्या मंगळवेढ्यातील २० तर बार्शीतील ८ हरकतींचा समावेश आहे.

Ganesh Festival २०२५ : 'गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार'; कऱ्हाड पालिकेत बैठक; शहरात सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू

नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकतीसाठी ३१ ऑगस्टची मुदत आहे. मुदत रविवारपर्यंत असली तरीही शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असल्याने हरकतीसाठी आता फक्त गुरुवार व शुक्रवार असे दोनच दिवस उरले आहेत. या दोन दिवसात हरकतींचा आणखी पाऊस पडला जाण्याची शक्यता आहे. सध्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकतींची प्रक्रिया सुरू असल्याने इच्छुकांचे खरे लक्ष नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. ही प्रक्रिया केव्हा होणार? याचाच कानोसा घेतला जात आहे.

नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागरचनेची प्रक्रिया सुरू केली असली तरीही आगामी नगराध्यक्ष कसे निवडणार? जनतेतून की नगरसेवकांमधून? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. या उत्सुकतेसोबतच यापूर्वी २०२२ मध्ये काढलेले नगराध्यक्षांचे आरक्षण कायम ठेवणार की नव्याने आरक्षण काढणार? याबद्दलही मोठी उत्सुकता आहे. नगराध्यक्ष जनतेतून की नगरसेवकांमधून आणि नगराध्यक्षांसाठी आरक्षण जुने की नवीन? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे.

असे होते नगराध्यक्षांचे आरक्षण

यापूर्वी २७ मार्च २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार नगराध्यक्षसाठी अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण महिला, बार्शीत नागरिकांचा मागास प्रवर्ग, दुधनीमध्ये अनुसूचित जाती, करमाळ्यात सर्वसाधारण, कुर्डुवाडीत सर्वसाधारण, मैंदर्गीमध्ये सर्वसाधारण महिला, मंगळवेढ्यात नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला, पंढरपूरमध्ये सर्वसाधारण, सांगोलामध्ये सर्वसाधारण महिला, मोहोळमध्ये शेवटच्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला, असे आरक्षण होते. अकलूज नगरपरिषदेची स्थापना ३ ऑगस्ट २०२१ रोजी झाली आहे. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे अद्याप आरक्षण निघालेले नाही व निवडणूकही झालेली नाही. अनगर नगरपंचायतीची स्थापना १ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली आहे. २८ जानेवारी २०२२ रोजी नगराध्यक्षासाठी सर्वसाधारण महिला, असे आरक्षण काढले. परंतु येथील निवडणूक अद्याप झालेली नाही.

Rambhau Gaikwad:ओबीसी नेते लक्ष्मण हाके जशास तसे उत्तर देणार: रामभाऊ गायकवाड;'मराठा आरक्षण जनजागृतीसाठी पंढरपुरातून रथयात्रा प्रभाग रचनेचे असे आहे वेळापत्रक
  • हरकतींसाठी मुदत : ३१ ऑगस्ट

  • हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी : १ ते ८ सप्टेंबर

  • अंतिम प्रभागरचना प्रसिध्दी : २६ ते ३० सप्टेंबर

  • आतापर्यंत आलेल्या हरकती

  • मंगळवेढा : २०, बार्शी : ८, पंढरपूर : ५, अकलूज : ४, कुर्डुवाडी : ३, अनगर : १ (नगरपंचायत असल्याने १८ ते २१ ऑगस्टपर्यंत मुदत होती), एकूण : ४१

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.