- rat२८p१५.jpg-
२५N८७७१९
दापोली ः येथील मोफत नेत्रतपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. रमेश कुणकेरकर.
---
डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे
डॉ. रमेश कुणकेरकर ः शिबिरात २००हून अधिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन दापोली कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत दापोली कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इन्फिगो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरात ते बोलत होते. या वेळी कृषी विद्याविभागाचे प्रमुख डॉ. ए. पी चव्हाण, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, रोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. पुष्पा पाटील, साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल आहिरे, इन्फिगोच्या नेत्रचिकित्सक डॉ. शिवानी गवई व इतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी गवई यांनी डोळ्यांच्या अंतर्गत विविध अवयवांची माहिती व तपासणीचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी, सूत्रसंचालन साहाय्यक प्राध्यापक डॉ. रणजीत महाडीक यांनी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ संशोधन साहाय्यक शिल्पा नाईक यांनी केले. या शिबिराला २००हून अधिक लाभार्थींनी तपासणी केली.