चलो मुंबई मोर्चात सहभागी झालेल्या बीडच्या वरप गावातील सतीश देशमुख यांचा हृदयविकाराने मृत्यू.
देशमुख हे कायम मराठा आंदोलनात सक्रिय राहिलेले आणि मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक होते.
तीन वर्षांपूर्वी देशमुख यांचा मुलगा विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडला होता, त्यामुळे कुटुंबावर दुसरी आपत्ती.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई मोर्चाची हाक दिली आहे. २७ ऑगस्ट रोजी मराठा बांधवांसह त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केली असून, आज सकाळी ते शिवनेरीमध्ये पोहोचले. मात्र, या प्रवासादरम्यान, एक दुर्देवी घटना घडली. चलो मुंबईच्या मोर्चात सहभागी झालेल्या बीडच्या वरप गावातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सतीश ज्ञानोबा देशमुख (वय वर्ष ४५) असं मृत आंदोलकाचे नाव आहे. त्यांचे आज सकाळी मोर्चादरम्यान ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. ते काही क्षणात खाली कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सतीश देशमुख हे कायम मराठा आंदोलनात सक्रिय राहिले होते. ते मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक होते.
आमदाराच्या मुलाच्या घराबाहेर आढळला मोलकरणीचा मृतदेह, शरीर अन् चेहऱ्यावर जखमा; नेमकं काय घडलं?प्रत्येक आंदोलनात आणि मोर्चामध्ये ते हजेरी लावत असत. यावेळी देखील ते चलो मुंबई मोर्चात सहभागी झाले होते, मात्र जुन्नर येथे अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
गणेश मिरवणुकीत भयंकर घडलं! नाचण्यावरून वाद, भररस्त्यात चाकूनं तरूणावर सपासप वार, कोल्हापूर हादरलंसतीश यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. देशमुख कुटुंबावर ही दुसरी मोठी आपत्ती ओढावली आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा विजेच्या धक्क्यानं मृत्यूमुखी पडला होता. सतीश यांचे वडील आर्मीमध्ये कार्यरत होते. या दुख: द घटनेनंतर बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.