- rat२८p४.jpg-
२५N८७६६२
अनिरूद्ध आठल्ये.
डॉ. अनिरूद्ध आठल्ये
आरोग्य उपसंचालकपदी
रत्नागिरी ः जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांची आरोग्यसेवेच्या उपसंचालकपदी पदोन्नती झाली आहे. त्यांची बदली या पदावर मुंबईला झाली आहे. डॉ. आठल्ये हे गेली चार वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. आठल्ये लवकरच उपसंचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्यकेंद्र, उपकेंद्राची समस्या जाणून घेत त्या सोडवण्यात डॉ. आठल्ये यांनी विशेष पुढाकार घेतला.
- rat२८p१.jpg-
२५N८७६५८
रवींद्र देवाळे
रवींद्र देवाळे यांची निवड
चिपळूण ः तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत अडरे मांडावखरी येथे महात्मा गांधी तंटामुक्ती गावसमिती अध्यक्षपदी रवींद्र देवाळे यांची निवड करण्यात आली. या वेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय कदम, सरपंच दीक्षा कांबळी, उपसरपंच संजना कदम, ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) वैजयंती राऊत, पोलिस पाटील सुभाष कदम, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
परदेश शिष्यवृत्ती
योजनेसाठी मुदतवाढ
रत्नागिरी : समाजकल्याण आयुक्तालयाद्वारे शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट होती. ती १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले. परिपूर्ण अर्ज https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरून त्याची प्रिंट व ऑफलाईन नमुन्यातील अर्ज समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाला १ सप्टेंबरपर्यंत सादर करावयाचा आहे. या विषयी अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in शासनाच्या या संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या लिंकवर भेट द्यावी, असेही कळवण्यात आले आहे.