पितृपक्षाच्या काळात घर स्वच्छ ठेवणे आणि तुटलेल्या वस्तू काढून टाकणे आवश्यक आहे. बंद पडलेली घड्याळे, तुटलेली भांडी आणि तुटलेल्या मूर्ती घरात ठेवल्यास पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नाही. अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे पितृपक्षापूर्वी त्यांचे विसर्जन करणे किंवा घरातून काढून टाकणे महत्त्वाचे आहे.
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पितृपक्षाला खुप महत्व आहे. पितृपक्षाच्या १५ दिवसांत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पिंडदान किंवा तर्पण केले जाते. असं मानलं जातं की पितृपक्षाच्या वेळी मृत नातेवाईकांचे आत्मे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी येतात. यामुळे याकाळात घर स्वच्छ आणि शुद्ध ठेवले पाहिजे. तसेच अशा नकारात्मक गोष्टी घरातून काढून टाकल्या पाहिजेत, ज्या पूर्वजांना आवडत नाहीत.
बंद पडलेले घड्याळबंद पडलेली किंवा खराब झालेली घड्याळे जीवनाची गती आणि प्रगती रोखतात. जर तुमच्या घरातही अशी घड्याळे असतील तर पितृपक्षापूर्वी ती दुरुस्त करा किंवा काढून टाका. पण बंद पडलेली घड्याळे कधीही भिंतीवर लटकवू नका.
तुटलेली भांडीजी भांडी तुम्ही वापरत नाही किंवा जी भांडी तुटलेली आहेत. ती पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाकावीत. ही भांडी नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळत नाहीत.
Ganesh Chaturthi 2025: एकदंतासमोर राशींनुसार करा 'या' मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका तुटलेल्या मूर्तीघरात कधीही तुटलेल्या मूर्ती किंवा देव-देवतांचे तुटलेले फोटो ठेवणे अशुभ मानले जाते. अशा मूर्ती घरी ठेवणे किंवा त्यांची पूजा करणे खूप अशुभ मानले जाते. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही त्यांचे पवित्र नदीत विसर्जन करावे.
निरुपयोगी वस्तूघरात निरुपयोगी गंजलेल्या वस्तू, रद्दी वस्तू किंवा जुने कपडे ठेवणे चांगले मानले जात नाही. अशा गोष्टी घराचे पावित्र्य बिघडवतात. म्हणून पितृपक्षाच्या आधी घरातून वस्तू काढून टाका.
घरात कोणत्या गोष्टी ठेवल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नाही?
उत्तर: तुटलेल्या वस्तू, अस्वच्छ कपडे, आणि धार्मिक स्थळांवर अयोग्य वस्तू ठेवल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळणे कठीण होते.
घरात नकारात्मक ऊर्जा का वाढते?
उत्तर: घरात तुटलेली भांडी, कालबाह्य वस्तू किंवा अस्वच्छता ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, जी पूर्वजांच्या आशीर्वादाला अडथळा आणते.
पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घर कसे ठेवावे?
उत्तर: घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे, धार्मिक स्थळे पवित्र ठेवावीत आणि तुटलेल्या किंवा नकारात्मक वस्तू काढून टाकाव्यात.
धार्मिक स्थळांवर कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
उत्तर: धार्मिक स्थळांवर चामड्याच्या वस्तू, मांसाहारी पदार्थ किंवा कोणत्याही अशुद्ध वस्तू ठेवू नयेत, कारण यामुळे पूर्वजांचा अपमान होऊ शकतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.