Satara Crime : कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावले; साताऱ्यात भररस्त्यावरील घटनेने खळबळ
Saam TV August 29, 2025 11:45 AM

सातारा : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्या जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र भररस्त्यावर महिलेला गाठत कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात प्रतापसिंह नगर परिसरात सकाळच्या सुमारास घडली आहे. यात भयभीत झालेल्या महिलांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करत पळ काढला. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

साताराशहरातील प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मोनी पार्क येथे सदरची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमानी कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी लूट केली आहे. 

Pimpri Chinchwad : दुचाकी, रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पिंपरी चिंचवड पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

मानेवर कोयता ठेवत मंगळसूत्र तोडले 

मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेला रस्त्यावर अडवून कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडली. यावेळी जिव वाचविण्याच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरून फारशी वर्दळ नसल्याने मदतीला देखील कोणी आले नाही. 

Wardha Rain : दोन तासाच्या पावसात शेती गेली खरडून; कापूस, सोयाबीनसह संत्रा बागांचे नुकसान

जीव वाचविण्यासाठी गेटवरून उडी 

तीन महिला सोबत जात असताना अचानक घडलेल्या या प्रकाराने महिलांनी आरडाओरड करत पळ काढला होता. हि संपूर्ण घटना सीसीटीव्हीकॅमेरात कैद झाली आहे. महिलांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.