नागपूर : भांडे धुण्याच्या कामासाठी पाचशे रुपये देतो, असे सांगून महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करून लुटल्याची धक्कादायक घटना राणाप्रतापनगरात २२ ऑगस्टला रात्री साडेदहा वाजताचा उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हेशाखेच्या युनिट चार आणि एकच्या पथकाने आरोपीस अटक केली.
रजनीशकुमार रामकृपाल दुबे (वय ५०, रा. नई घडी, रामपूर, रिवा, मध्यप्रदेश, हल्लीमुक्काम, शिवशक्ती बार, जुना कामठी रोड) असे आरोपीचे नाव आहे.
५० वर्षीय पीडिता साफ-सफाईचे काम करून घरी जात असताना, तिला रजनीशकुमार याने तिला स्वतः स्वयंपाकी असल्याचे सांगून भांडे धुण्यासाठी एका तासाचे ५०० रुपये देतो, अशी बतावणी केली. एक तासाचे काम असल्याने तिनेही होकार देत, त्याच्यासोबत कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाली.
Prachi Parkhi: ‘ती’ घराच्या गच्चीवरच घडवत आहे खेळाडू; आंतरराष्ट्रीय महिला जिम्नॅस्ट व प्रशिक्षक प्राची पारखीची प्रेरणादायी कहाणीदुबे याने तिला प्रतापनगरातील एका निर्जन स्थळी नेले. तिथे जबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या सोन्याच्या गोफ, कानातील दागिने आणि रोख साडेतीन हजार रुपये लुटून पसार झाला. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याचा समांतर तपास करताना, गुन्हेशाखेच्या युनिट चार, युनिट एक तसेच, सोनसाखळी पथकांनी त्याला कळमन्यातील घरातून ताब्यात घेतले.