कऱ्हाड: शहरात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पालिकेच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. पालिका व एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात आज बैठक झाली. छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, वाइल्ड रेस्क्यू टीम, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विजय दिवस समारोह, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, उपमुख्याधिकारी प्रफुल्ल वानखेडे, नगरअभियंता सुधीर चव्हाण, अभियंता अमोल जाधव, माजी अभियंता ए. आर. पवार, एन्व्हायरोचे अध्यक्ष जालिंदर काशीद, आरोग्य अभियंता आशिष रोकडे, श्री. रणदिवे उपस्थित होते.
Ganesh festival २०२५: 'गणरायांच्या आगमनाने आनंदवर्षा'; सातारा जिल्ह्यात वरुणराजाच्या विश्रांतीने उत्साहाला उधाणया वेळी गणेशमूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी नदीपात्रात मूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम तळ्यामध्ये करावे. यंदा दहा हजारपेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करण्यात येणार असून, नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवरील बंदी उठवल्यामुळे मोठ्या प्रमाणात मूर्ती बाजारात विक्रीस आल्या आहेत. त्यामुळे या मूर्तींचे विसर्जन नदीत न करता ते कृत्रिम तळ्यातच करणे गरजेचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयानेही मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तळ्यात करण्याचा आदेश दिले आहेत. मोठ्या मूर्ती कृत्रिम तळ्यातच होण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. विविध विषयांवर चर्चा व सूचना करण्यात आल्या. कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना पालिकेने कापडी पिशवी द्यावी, यासह अन्य सूचना झाल्या. ए. आर. पवार यांनी प्रास्ताविक केले. अमोल जाधव यांनी आभार मानले.
Ahilyanagar News: 'अहिल्यानगर जिल्ह्यात १८ लाख आयुष्मान कार्डधारक'; जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्ड नोंदणीसाठी विशेष मोहीम मगर, सापांमुळे घ्या नदीपात्रात काळजी...सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्यात येणार आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्याने नदीत पाणी वाढले आहे. नदीपात्रात मगर, सापांचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात काळजी घ्यावी. नागरिकांना सूचना देण्यासाठी पालिकेसह सामाजिक संस्था नदीकाठावर असतील. मात्र, नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये, नदीकाठावर प्रथमोपचार पेटी, रुग्णवाहिकेची सोय करण्यात येईल. कृत्रिम तळ्यांशेजारीच निर्माल्य कलश ठेवला जाणार आहे.