धाराशिव : मध्यस्थामार्फत नवरी शोधून लग्न करण्याचा प्रकार वडगाव (सि.) येथील तरुणाच्या चांगलाच अंगलट आला. लग्न जमवून खोटा विवाह करीत सातारा जिल्ह्यातील नवरीसह पाच जणांनी त्याला सव्वा लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बाळासाहेब हरिभाऊ मोरे (वय ३३, रा. वडगाव (सि.), ता. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार धाराशिव शहर पोलिस ठाण्यात नवरीसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दीपाली अविनाश साळवे, युवराज पाटील, दशरथ जहागीरदार (तिघे रा. पाटण, ता. पाटण, जि. सातारा), शांताबाई (रा. बैलबाजार, भारत पेट्रोल पंपाजवळ, कराड), अविनाश मिलिंद साळवे (रा. गणेशनगर, वडाळा, ईस्ट मुंबई, मूळ, रा. देवळी, ता. मानगाव, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
Nana Patole: जातिनिहाय जनगणनाच आरक्षणाच्या संघर्षावर उपाय; नाना पटोले, जरांगेंनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (ता. २३) ते मंगळवार (ता. २६) यादरम्यान हा प्रकार घडला. वडगाव (सि.) येथे फिर्यादीशी संशयितांनी तोतयेगिरी करून तरुणीचा खोटा विवाह लावून दिला. त्यासाठी त्याच्याकडून एक लाख २० हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केली आहे.