Pakistan News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात महापुराचा तडाखा १७ बळी
esakal August 29, 2025 10:45 PM

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेकडो गावे पुराखाली गेली असून गेल्या २४ तासांत किमान १७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. सतलज, रावी आणि चिनाब नद्यांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे या प्रांतातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.

तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.पंजाब आपत्कालीन सेवेनुसार गेल्या २४ तासांत पुरात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Canada Study Permit: कॅनडामध्ये स्टडी परमिटशिवाय शिक्षणाची परवानगी; कोण पात्र? काय आहेत नियम? वाचा, एका क्लिकवर

सियालकोटमध्ये सात, गुजरातमध्ये चार, नारोवालमध्ये तीन, हाफिजाबादमध्ये दोन आणि गुजरावालामध्ये एकाचा मृत्यू झाला. पूरग्रस्त भागात बचावकार्य राबविण्यास सुरुवात झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.