नाशिक: बिऱ्हाड आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी समाजाचे सर्व आमदार शुक्रवारी (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
आदिवासी विकास विभागातील बाह्यस्त्रोतांद्वारे होणारी भरती थांबवावी, या मागणीसाठी मागील ५२ दिवसांपासून आयुक्तालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस तसेच आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांची भेट घेतली होती. मात्र, अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
Student: रस्ते नीट करा, अन्यथा आम्ही शिक्षण थांबवू! जीवघेण्या प्रवासाला कंटाळून आडूळ येथील विद्यार्थिनींचा ग्रामपंचायतीला इशाराया विलंबामुळे आंदोलकांनी वारंवार आपला रोष व्यक्त केला. आयुक्तालयासमोर निदर्शनेही केली, तरी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रोजंदारी कर्मचारी आजही ठिय्या आंदोलनावर आहेत. आंदोलकांच्या वतीने आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. मात्र आमदारांच्या पातळीवरही समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर बिऱ्हाड आंदोलक मुंबई गाठण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती ललित चौधरी यांनी दिली.