आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 स्पर्धेतील 81 वा सामना कॅनडा आणि स्कॉटलँड यांच्यात झाला. हा सामना किंग सिटीच्या मेफल लीफ नॉर्थ वेस्ट मैदानात खेळला गेला. या सामन्यात एका दुर्मिळ विक्रमाची नोंद झाली आहे. या विक्रमाची आता सर्वत्र चर्चा होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल स्कॉटलँडच्या बाजूने लागला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कॅनडा संघाला पहिल्याच दोन चेंडूंवर धक्का बसला. या दोन चेंडूवर सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतले. खरं तर असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. एक सलामीचा आणि एक वनडाऊन येणारा फलंदाज बाद झाला असेल. पण सलामीला उतरलेले दोन्ही फलंदाज पहिल्या दोन चेंडूवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्कॉटलँडकडून ब्रॅड करी पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी समोर अली नदीम होता. पहिल्याच चेंडूवर फटका मारताना अली नदीम चुकला आणि मार्क व्याटच्या हाती झेल गेला. गोल्डन डकवर बाद होत तंबूत परतला. त्यानंतर स्ट्राईकला प्रगत सिंग आला. त्याने स्ट्रेट चेंडू मारला आणि ब्रॅड करीच्या हाताला चेंडू लागला. हा चेंडू नॉन स्ट्राईयकरच्या यष्टींना लागला आणि युवराज सामरा धावचीत झाला. युवराज सामरा एकही चेंडू न खेळता तंबूत परतला. त्यामुळे पहिल्या दोन चेंडूवर दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतले.
कॅनडाने या सामन्यात 48.1 षटकांचा सामना केला आणि 184 धावा केल्या. यासह स्कॉटलँडसमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान स्कॉटलँडने 3 गडी गमवून 41.5 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात जॉर्ज मुन्सेला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने 103 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 84 धावांची खेळी केली.
स्कॉटलंड (प्लेइंग इलेव्हन): रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, जॉर्ज मुन्से, ब्रँडन मॅकमुलेन, फिनले मॅकक्रीथ, चार्ली टीअर (यष्टीरक्षक), मायकेल लीस्क, जोश डेव्ही, मार्क वॅट, ब्रॅड करी, सफयान शरीफ.
कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): अली अब्बासी, युवराज समरा, परगट सिंग, दिलप्रीत बाजवा, श्रेयस मोव्वा, निकोलस किर्टन (कर्णधार), जसकरण सिंग, कलीम सना, साद बिन जफर, अखिल कुमार, शाहिद अहमदझाई.