आशिया कप 2025 स्पर्धेआधी यजमान यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानने या मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. पाकिस्तानने या मालिकेत अफगाणिस्तान आणि त्यानंतर यूएईला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तान आणि यूएईला आतापर्यंत विजयाची चव चाखता आलेली नाही. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध यूएई आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून कोणता संघ विजयाचं खातं उघडतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
त्यानंतर या मालिकेतील चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची या मालिकेत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. पाकिस्तानने या ट्राय सीरिजमधील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात करत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आता अफगाणिस्तानकडे आगामी सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर पाकिस्तान सलग तिसऱ्या आणि अफगाणिस्तान विरुद्ध दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना मंगळवारी 2 सप्टेंबरला होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता नाणेफेक होईल.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर लाईव्ह मॅच फॅनकोड एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.
पाकिस्तानने 29 ऑगस्टला अफगाणिस्तानवर 39 धावांनी विजय मिळवला होता. पाकिस्तानने विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिल होतं. अफगाणिस्तानला प्रत्युत्तरात 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 143 धावाच करता आल्या. त्यामुळे आता अफगाणिस्तान पाकिस्तानचा हिशोब करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.