गुंतवणूक योजना: अनेकांना असे वाटते लहान रक्कम गुंतवण्यात (Investment) मोठा फायदा होत नाही. पण जर तुम्ही म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये एकरकमी गुंतवले तर ती किती मोठी रक्कम बनू शकते याची माहिती तुम्हाला आहे का? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही रक्कम तुम्हाला 30 वर्षांसाठी दरमहा सुमारे 17 हजार 500रुपयांचे नियमित उत्पन्न देखील देऊ शकते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
समजा तुम्ही एका एकरकमी इक्विटी म्युच्युअल फंडात 1 लाख रुपये गुंतवले जिथे तुम्हाला 12 टक्के वार्षिक परतावा मिळतो. 30 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. कर भरल्यानंतरही, तुमच्याकडे सुमारे 26.5 लाख रुपये असतील. आता तुम्ही ही रक्कम SWP द्वारे हायब्रिड किंवा डेट फंडमध्ये हस्तांतरित करता, जिथे तुम्हाला सुमारे 7 टक्के सुरक्षित परतावा मिळतो. याद्वारे, तुम्हाला दरमहा 17500 रुपये नियमित उत्पन्न मिळू शकते आणि हे उत्पन्न 30 वर्षे चालू राहील. एकूणच, तुम्ही 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुमारे 63 लाख रुपये काढले असते आणि शेवटी तुमच्याकडे काही बचतही शिल्लक राहते.
सर्वप्रथम, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि योग्य जागा निवडणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आजपासून म्युच्युअल फंडमध्ये, विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केली, तर दीर्घकाळात एक छोटी रक्कम देखील मोठी रक्कम बनू शकते. यामागील रहस्य म्हणजे चक्रवाढ म्हणजेच व्याजावर व्याज मिळवण्याचे सूत्र, तुम्ही गुंतवणुकीला जितका जास्त वेळ द्याल तितकी ती वाढेल.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत, एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि एकरकमी गुंतवणूक. एसआयपीमध्ये, तुम्ही दरमहा थोडे पैसे गुंतवता, ज्यामुळे हळूहळू तुमचा मोठा निधी तयार होतो. तर, एकरकमी गुंतवणूकीत, तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवता येते. दरम्यान, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूककरणे तुमच्या फायद्याचे ठरते. कारण या गुंतवणुकीवरपरतावा देखील चांगला मिळतो. कमी काळात अधिक पैसे मिळतात. त्यामुळं गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग स्वीकारणे सोयीस्कर ठरते. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं असतं.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा