सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवशी ३८ हरकती दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण १७२ हरकती दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर बुधवारपासून (ता. ३) उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रभागरचना अंतिम केली जाणार आहे.
New Delhi:'आगीच्या संकेतामुळे विमान उतरविले'; एअर इंडियाच्या विमानात आगीचे संकेत, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणबार्शी, पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी, मंगळवेढा, अकलूज, मोहोळ, अक्कलकोट, करमाळा, दुधनी, मैंदर्गी या ११ नगरपरिषदा व अनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती.
या प्रभागरचनेवर ११ नगरपरिषदांसाठी १८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान तर अनगर नगरपंचायतीसाठी १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. आज हरकती दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३८ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये बार्शीसाठी ९, अक्कलकोटसाठी १, सांगोल्यासाठी ६, कुर्डुवाडीसाठी १, मंगळवेढ्यासाठी ९ आणि मोहोळसाठी १२ हरकती दाखल झाल्या आहेत.
दाखल झालेल्या हरकतींवर १ ते ८ सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी सुनावणी घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशानुसार सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांना प्राधिकृत केले आहे. जिल्ह्यातून दाखल झालेल्या हरकतींवर बुधवारपासून (ता. ३) सुनावण्यांना सुरुवात होणार आहे. या सुनावणीनंतर नगरपरिषदांची व नगरपंचायतींची प्रभागरचना अंतिम केली जाणार आहे.
तीन नगरपरिषदांतून एकही नाही हरकत
प्रारूप प्रभागरचनेवर जिल्ह्यातील ११ पैकी ८ नगरपरिषदांमधूनच आक्षेप व हरकती आल्या आहेत. जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांमधून एकही हरकत आली नाही. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी व दुधनी आणि करमाळा नगरपरिषदेचा समावेश आहे.
PM Narendra Modi: ‘नैसर्गिक आपत्तीमुळे प्रत्येकाचे मन दुःखी’: पंतप्रधान नरेंद्र मोदी; स्वदेशीचा अंगीकार करण्याचे आवाहन नगरपरिषद अन् दाखल हरकतीबार्शी : ६१, पंढरपूर : २४, सांगोला : ९, कुर्डुवाडी : ५, मंगळवेढा : ४२, अकलूज : ४, मोहोळ : २३, अक्कलकोट : ३, अनगर नगरपंचायत : १, एकूण : १७२