दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिका यजमान इंग्लंड विरुद्ध 2 ते 14 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. टेम्बा बावुमा या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. या एकदिवसीय मालिकेत क्रिकेट चाहत्यांना जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उभयसंघातील पहिला एकदिवसीय सामना कुठे आणि कधी पाहता येणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी 2 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना हेंडीग्ले लीड्सममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलंय. हॅरी ब्रूक नेतृत्व करणार आहे. तसेच विस्फोटक फलंदाज जोस बटलर विकेटकीपर म्हणून जबाबदारी पाहणार आहे. तसेच टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिकेत मायदेशात अनेक विक्रम करणारा अनुभवी फलंदाज जो रुट हा देखील प्लेइंग ईलेव्हनमध्ये आहे. त्यामुळे रुट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. त्यामुळे या मालिकेत यजमान विजयी सलामी देतात की दक्षिण आफ्रिका सामना जिंकते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.