Viral Video : बघता बघता 18 लोकांचं कुटुंब वाहून गेलं, कोणी काहीच करु शकले नाही! हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल
Tv9 Marathi September 02, 2025 11:45 PM

गेल्या अनेक दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने पाकिस्तानात हाहाकार माजवला आहे. पंजाब प्रांतात पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे. लोकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बचाव कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे सुमारे 5 लाख लोक विस्थापित झाले आहेत. अधिकारी म्हणाले की, ते लोकांना मदत देण्यासाठी सतत बचाव मोहीम राबवत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आलेल्या पुरात एकाच कुटुंहातील १८ लोक वाहून गेल्याचे दिसत आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर एका यूजरने पाकिस्तानमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वात नदीला आलेला पूर दिसत आहे. या पूरात 18 लोकांचे कुटुंबीय अडकले आहेत. ते एका धिगाऱ्यावर उभे असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्या चारही बाजूला पाणी दिसत आहे. हळूहळू करुन हा मातीचा धिगारा कोसळताना दिसत आहे. तसेच त्यावर उभे असलेले कुटुंबातील सदस्य देखील वाहून जताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Viral Video: मगरींनी घेरलं, पण ‘आकाशाचा राजा’ने वाचवले! सिंहच्या बछड्याच्या खतरनाक व्हिडीओ

Thread of Heart-Breaking Moments in History When a Disaster Strikes 🧵

1. A tragic incident in Swat, Pakistan 💔 18 members of a single family swept away after flash floods hit the river Swat
pic.twitter.com/xq2jovrCN0

— Earth_Wanderer (@earth_tracker)

पंजाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, 26 जूनपासून आतापर्यंत मान्सून दरम्यान सुमारे 835 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 195 मृत्यू एकट्या पंजाब प्रांतात झाले आहेत.

तिन्ही नद्यांचे पाणी

भारताच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधून वाहणाऱ्या तीन आंतर-सीमा नद्यांची पाणी पातळी खूप जास्त वाढली आहे. यामुळे नद्यांच्या आसपासच्या सुमारे 2,300 हून अधिक गावांवर परिणाम झाला आहे. पंजाब प्रांत सरकारने चिनाब, रावी आणि सतलज नद्यांचे वाढते पाणी वळवण्यासाठी पूर बंधाऱ्यांचे नियंत्रित कटाव सुरू केले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की तीनही प्रमुख नद्या एकाच वेळी उधाणावर आल्या आहेत.

अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

पंजाब सरकारच्या मदत सेवांचे प्रमुख नबील जावेद यांनी सांगितले की, या भयानक पुरात अडकलेल्या 4 लाख 80 हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, तसेच सुमारे 4 लाख प्राण्यांना देखील सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पुरामुळे 1.5 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. प्रांताच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख इरफान अली खान यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, हा पंजाबच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव अभियान आहे.

खान म्हणाले की, 800 हून अधिक बोटी आणि 1,300 बचावकर्मी प्रभावित भागातून कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी कार्यरत आहेत, ज्यापैकी बहुतेक लोक या तीन नद्यांच्या काठावर राहतात. त्यांनी सांगितले की, कोणत्याही मानवी जीवाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. खान यांनी सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलेल्या मान्सूनी पुरात 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.