सातारा : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी एक हजार ४२३ गावांमध्ये कृत्रिम तळी, जुन्या वापराविना असलेल्या पडक्या विहिरीत सोय केली आहे. नद्या, तलाव, विहिरीमध्ये मूर्ती विसर्जन टाळून जलप्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे सुपूर्द करण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला असून, निर्माल्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध केली आहे.
Solapur News:'निजामशाहीत असलेल्या ‘त्या’ ५८ गावांचा पुन्हा संघर्ष'; मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास उभा करावा लागणार स्वतंत्र लढानद्या, तलावांमध्ये मूर्ती टाकल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यंदा शासकीय पातळीवर प्रदूषण रोखून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये निर्माल्य पाण्यात टाकल्याने देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी निर्माल्याचे (फूल, हार, नैवेद्य) व्यवस्थापन करण्यासाठी तेराशेहून अधिक ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर व २९० हून अधिक ग्रामपंचायतींनी घंटागाडी, मोठे डस्टबिन उपलब्ध करून दिले आहेत.
ग्रामपंचायतस्तरावर दोन सप्टेंबर व सहा सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) यादिवशी मोठ्या प्रमाणावर कुटुंबस्तरावरील व गणेश मंडळाकडील पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व निर्माल्य संकलन होणार आहे. या कामासाठी जिल्हास्तरावरून तालुक्यांकरिता संपर्क अधिकारी, तसेच तालुकास्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.या उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक नागरिक सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
निर्माल्यापासून जैविक खत तयारपर्यावरणपूरक गणेशोत्सवात निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यापासून जैविक खत तयार करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार ३६८ ग्रामपंचायतीमध्ये राबवली जाणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले यांनी दिली.
Karad News: 'मंडळांनी घेतला कारवाईचा धसका'; आवाजाच्या भिंतीवरील कारवाईचा परिणाम, पारंपरिक वाद्यांना पसंतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व घटकांच्या सहभागातून हा उपक्रम लोकाभिमुख होत आहे. यामध्ये गणपती मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचाच वापर करावा. निर्माल्यासाठी वेगळी सोय केली असून, नागरिकांनीही सूचनांचे पालन करावे.
-याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी.