Cricket : आशिया कपआधी स्टार खेळाडू डेंग्यूमुळे टीममधून बाहेर, कुणाला संधी?
GH News September 03, 2025 09:25 PM

आशिया कप 2025 स्पर्धेआधी टीम इंडियाच्या खेळाडूला डेंग्यू झाला आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडिया यूएईला 4 सप्टेंबरला रवाना होणार आहे. मात्र त्याआधी विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे ध्रुवला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. ध्रुवकडे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. मात्र आता ध्रुव या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना 4 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ध्रुवला बाहेर व्हावं लागल्याने सेंट्रल झोनला मोठा झटका लागला आहे.

ध्रुवला याआधी दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यांनानाही मुकावं लागलं होतं. ध्रुवला दुखापतीमुळे या सामन्यात खेळता आलं नाही. त्यानंतर आता ध्रुवला डेंग्यूमुळे खेळता येणार नाहीय. ध्रुवच्या जागी सेंट्रल झोन टीममध्ये विदर्भाचं नेतृत्व करणाऱ्या अक्षय वाडकर याचा समावेश करण्यात आला आहे.

ध्रुवचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश

दरम्यान आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे. मात्र ध्रुव मुख्य संघातील भाग नाही. ध्रुवचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ध्रुवला डेंग्यू झाल्याने भारताच्या आशिया कप मोहिमेवर काहीच परिणाम होणार नाहीय.

बीसीसीआय निवड समितीने आशिय कप स्पर्धेसाठी 5 खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश केला. निवड समितीने 19 ऑगस्टला भारतीय संघ जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांनी भारतीय संघासह यूएईला राखीव खेळाडू जाणार नसल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्सध्ये म्हटंल आहे.

सेंट्रल झोन टीम : रजत पाटीदार (कर्णधार), आर्यन जुयाल, दानिश मालेवार, संजीत देसाई, यश ठाकुर, आदित्य ठाकरे, दीपक चाहर, अक्षय वाडकर, सारांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सूथार आणि खलील अहमद.

राखीव खेळाडू: महिपाल लोमरोर, माधव कौशिक, युवराज चौधरी, कुलदीप सेन आणि उपेंद्र यादव.

टीम इंडिया आणि आशिया कप 2025

दरम्यान टीम इंडियाचा आशिया कप 2025 स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ 10, 14 आणि 19 सप्टेंबरला अनुक्रमे यूएई, पाकिस्तान आणि ओमान विरुद्ध भिडणार आहे. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.