Kolhapur Fire & Killed case : कोल्हापूर शहरातील हनुमान नगर, आयटीआय ते पाचगाव रस्त्यावर आज गुरूवार सकाळी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रिक्षा चालक मोहन सूर्यकांत पोवार (वय ६५) यांचा त्यांच्या राहत्या घरात खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोवार हे सकाळच्या सुमारास घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेला होता. याचदरम्यान एक अज्ञात व्यक्ती घरात शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही वेळातच घरातून धूर येताना पाहून स्थानिकांनी तत्काळ धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवून पाहणी केल्यानंतर घरात मोहन पोवार हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे निशाण दिसून आले. त्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
Kolhapur Farmers Protest : रेल्वे विभागाचा मनमानी कारभार, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला शिकवला धडा...घर पेटवून शॉर्ट सर्किटचा बनाव करण्यात आाल्याचा आरोप मुलाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.