पुणे : महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ७५ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतला आहे.
या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. बुधवारी घेतलेल्या शिक्षण मंडळाच्या बैठकीत आयुक्तांनी शाळांच्या इमारती, खेळाची मैदाने, शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा यांचा आढावा घेतला.
आयुक्त म्हणाले, ‘‘केवळ इमारती व मैदाने चांगली असून चालणार नाही, तर शिक्षणाचा दर्जाही उंचावणे आवश्यक आहे. यासाठी यापूर्वी झालेले चांगले प्रयत्न लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला प्राधान्य दिले जाईल.
लवकरच या संदर्भात सविस्तर आराखडा तयार करून अंमलबजावणी सुरू होणार आहे.’’ महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील शाळांच्याही इमारती व मैदानांच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
Pune Flood Risk : पुण्यातील मुळा मुठा नदीला पूर धोका ४० टक्के वाढला; जलसंपदा विभागाचा अहवाल धक्कादायकया शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आवश्यक सुविधा देण्यावर भर देण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.