पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ३३ वर्षीय फलंदाजानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. आशिया कप २०२५साठी संघात निवड न झाल्यानं रागाच्या भरात त्यानं हा निर्णय घेतला अशल्याचं सांगण्यात येतंय. असीफ अलीने पाकिस्तानकडून २१ एकदिवसीय आणि ५८ टी२० सामने खेळले आहेत. त्यानं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात असिफ अली बॅट घेऊन फरीद मलिकच्या अंगावर धावून गेला होता. त्या वादामुळे तो चर्चेत आला होता. असिफ अलीने पोस्ट करत म्हटलं की, पाकिस्तानची जर्सी घालणं माझ्या आयुष्यातील मोठा सन्मान होता. क्रिकेटच्या मैदानात आपल्या देशाची सेवा करणं माझ्यासाठी अभिमानास्पद होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असून देशांतर्गत आणि लीग क्रिकेटमध्ये खेळत राहीन.
Champion Trophy: मोहम्मद शमीचा ५ विकेट्स घेत पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम, मिचेल स्टार्क अन् झहीर खानलाही टाकलं मागेअसिफ अलीने पाकिस्तानकडून वेस्ट इंडिज विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं. कराचीत १ एप्रिल २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळळा होता. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९९२च्या वर्ल्ड कप विजेत्यांसाठी झालेला बांगलादेशविरुद्धचा सामना होता. २०२३ मध्ये हा सामना हांगझोऊ इथं झाला होता.
पाच वर्षांच्या कारकिर्दीत असिफने १६ एकदिवसीय सामन्यात ३८२ धावा केल्या. यात त्याच्या २२ चौकार आणि २१ षटकारांचा समावेश आहे. तर ५१ टी२० सामन्यांमध्ये ५७७ धावा केल्या. यात त्यानं २७ चौकार आणि ३७ षटकार मारले होते. टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत असिफ अलीला पाकिस्तानच्या संघात संधी मिळाली होती. त्यानं २९ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात त्यानं ७ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. भारताविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला होता.
Babar Azam : पाकिस्तानचा 'किंग' प्रदर्शनीय सामन्यातही क्लिनबोल्ड, नेटिझन्सनी घेतली मजा; Video viralसराव सत्रात दररोज १००-१५० षटकार मारण्याचा दावाही असिफ अलीने केला होता. आशिया कप २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बाद झाल्यानंतर तो गोलंदाजाच्या अंगावर धावून गेला होता. दोघांमध्ये मारहाण होता होता राहिली होती.