कऱ्हाड: आवाजाच्या भिंती लावल्या तरी त्याचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेतच ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाच्या भिंती लावून मोठ्या प्रमाणात आवाज सोडल्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात चार ते पाच कारवाया करून मंडळांना आणि आवाजाच्या भिंती चालकांना इशारा दिला आहे. त्याचा चांगलाच धसका जिल्ह्यातील गणेश मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आवाजाच्या भिंतीला पर्याय म्हणून आता पारंपरिक वाद्यांना पसंती दिल्याचे दिसत आहे.
Sangamner Crime: खताळांकडून मुलाची फसवणूक; प्रसाद गुंजाळच्या आईची पोलिसात तक्रार, दबावाचा आरोपयंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, झांजपथक, बॅण्ड, बॅन्जोचा जास्त वापर असेल, यासाठीही प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार असून, वाद्ये विक्रेत्यांनाही अच्छे दिन आले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या भिंती उभ्या करून नाचण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून रूढ झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील ईर्षा वाढल्याने स्पीकरचा आवाज वाढतच चालला आहे.
त्यामुळे कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना नाइलाजाने त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने मिरवणुकीत वाजणाऱ्या आवाजाच्या भिंतीमुळे वयोवृद्धांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या मर्यादेत आवाज ठेवायची परवानगी दिली आहे, त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. आवाजाच्या भिंतीच्या आवाजावर मर्यादा न राहिल्याने त्यावरील कारवाईचा पहिला श्रीगणेशा सातारा पोलिसांनी मंडळावर गुन्हा दाखल करून केला आहे. प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेमुळे मंडळांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मंडळांनी स्वतःहून आवाजाच्या भिंतींना फाटा देत पारंपरिक वाद्यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक ढोल पथके, झांजपथकांसह लेझीम पथकांना मंडळाकडून पसंती देण्यात येत आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, झांजपथक, बॅण्ड, बॅन्जोचा जास्त वापर दिसावा, यासाठी प्रशासनाकडून प्रबोधन सुरू आहे. त्यातून ध्वनिप्रदूषण कमी होणार हातभार लागणार आहे.
गणेशोत्सवात यंदा मोठ्या प्रमाणात मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. आवाजाच्या भिंतीवर कारवाई केली जात असल्याने यंदा पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम, झांज या वाद्यांना कार्यकर्त्यांनी पसंती दिल्याचे दिसत आहे. त्याला यंदा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे वाद्य विक्रेत्यांचा व्यवसायही वाढला आहे.
- अभिजित वसगडेकर, वाद्यविक्रेते, कऱ्हाड.
Solapur News:'निजामशाहीत असलेल्या ‘त्या’ ५८ गावांचा पुन्हा संघर्ष'; मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास उभा करावा लागणार स्वतंत्र लढा आवाजाच्या भिंतीवरील कारवाईसातारा - एक गुन्हा
सातारा तालुका - एक गुन्हा
कऱ्हाड शहर - एक गुन्हा
अशी आहे
आवाजाची मर्यादा
औद्योगिक क्षेत्र - ७५ डेसिबल
वाणिज्य क्षेत्र - ६५ डेसिबल
निवासी क्षेत्र - ५५ डेसिबल
शांतता क्षेत्र - ५० डेसिबल