Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीनेही उत्तम काम केले - एकनाथ शिंदे
esakal September 03, 2025 10:45 AM
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगेनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. आज दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस असल्याचे जरांगेंनी म्हटलं आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी सरकारचा अध्यादेश स्वीकारला

मराठा आराक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केला आहे. यासंदर्भात सरकारकडून काढण्यात आलेला अध्यादेश मनोज जरांगेंनी स्वीकारला आहे.

Live: आज मनोज जरंगे मुंबई सोडणार

आज मनोज जरंगे मुंबई सोडणार

१ तासात सरकार जीआर काढणार

Live: ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करणार- मनोज जरांगे पाटील

जीआर काढल्यानंतर गुलाल उधळून जाणार.. तुमच्या डोक्यावर आनंदाने गुलाल टाकला जाईल. जीआर काढल्यानंतर आज रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली होईल. लवकर जीआर काढा.. नाचत नाचत सर्वजण मुंबई सोडतील. तुमच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालोय.

Live: राजे तुमचा शब्द अंतिम.. तुम्ही 15 दिवस बोलले, मी एक महिना देतो, मनोज जरांगे

मराठा आणि कुनबी एक असल्याचा जीआर काढा यावर सरकारने वेळ मागितला आहे. मराठा आणि कुनबी एक असल्याचा जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ४५ दिवसांचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विखे पाटील यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला. त्यावर जरांगेंनी दोन महिन्याचा वेळ दिला आहे.

Mumbai Live : मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता

-हैदराबादच्या गॅजेटची अंमलबजावणी

-सातारा संस्थानच्या गॅजेटेयर तपासून कायदेशीर पद्धत्तीने जलदगतीने म्हणजेच 15 दिवसांत अमंलबजावणी करणार .

-सातारा गॅजेटेअर लागू करण्यासाठी मी एक महिना दिला आहे

Nashik Live : नगरसेवकांचे काम बोलते, पण राजकीय धुसफूस वाढली: प्रभाग ३० ची स्थिती

२०१७ च्या निवडणुकीत भाजपचे सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, राखीव जागेवर ॲड. श्याम बडोदे निवडून आले. परंतु अवघ्या दीड वर्षातच हद्दीवरून वाद झाले. वादाचे पर्यावसन वाहनांच्या तोडफोडीपर्यंत पोचले. कायदेशीररीत्या वाद मिटले, पण मनातील दुरावा कायम असल्याने पक्ष एकच असला तरी एकमेकांविरोधातच खेळी खेळल्या जातील, असे बोलले जात आहे.वडाळा गाव व आसपासच्या वसाहतींमध्ये होणारे बंपर मतदान मात्र त्या तुलनेत इंदिरानगर भागात होणारे कमी मतदान हे वैशिष्ट्य असल्याने यंदाची निवडणूक वडाळा विरुद्ध इतर अशीच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. वडाळा गाव परिसराची वास्तवापेक्षा जाणीवपूर्वक अधिकची बदनामी केली जात असल्याची भावना या भागात तयार होत आहे. त्यात सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. मुस्लिम मतदार अर्थातच निर्णायक असतील.

Mumbai Live : मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात

मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात होत आहे. कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

Mumbai Live : मराठा समाज आक्रमक; CSMT रोड वर CRP तुकड्या व अश्रूधुराच्या नळकांड्या तैनात

सी एस एम टी चा रोड वर सीआरपी दाखल

अश्रू धुराच्या नळकांड्या गन देखील सोबत

तीन वाजेपर्यंत मुंबई सोडण्याच्या न्यायालयाच्या निर्णया नंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे

Mumbai Live : पोलीस आझाद मैदानात दाखल

पोलीस आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

Beed Live : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; उद्या बीड जिल्हा कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या टोकाच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर ‘बीड बंद’चे बॅनर व्हायरल होत असून, जिल्हाभरात संपूर्ण बंद पाळून उपोषणाला समर्थन दिले जाणार आहे.

Mumbai Live : CSMT परिसरात तणाव; पोलिस-आंदोलकांमध्ये वाद पेटला

CSMT परिसरात कारवाई 

पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद

आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही- उच्च न्यायालय

आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही. सरकार काय करत होते, याबाबतही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमचे निदर्शक या न्यायालयाच्या न्यायाधीशांना रस्त्यावरून चालत त्यांच्या न्यायालयात पोहोचण्यासाठी आणि कामकाज चालवण्यास कसे भाग पाडू शकतात? तुमचे निदर्शक रस्त्यावर नाचत होते म्हणून तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असे चालण्यास भाग पाडू शकत नाही. उल्लेखनीय म्हणजे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांना काल उच्च न्यायालयाकडे चालत जावे लागले, जेव्हा त्यांनी त्याच प्रकरणात विशेष सुनावणी घेतली.

Mumbai Live: ...अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करू, कोर्टाचा गंभीर इशारा

आज दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करु, असा गंभीर इशारा कोर्टाने दिला आहे. कोर्टात जे सादर केलेलं आहे ते आम्ही पाहिलं, जे धक्कादायक आहे. यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत, असे न्यायमूर्ती म्हणाले.

Mumbai Live: हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे - न्यायमूर्ती

हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी. आंदोलन पूर्णपणे बेकायदा आहे. मुंबईतील परिस्थिती सहन करण्यासारखं नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

Manoj Jarange Patil Live Updates: कोर्टाकडून राज्य सरकारला ३ वाजेपर्यंतचा वेळ

मुंबईतील आंदोलकांवर काय कारवाई केली? यापुढे तूम्ही काय कऱणार आहात? राज्य सरकारने कोणती चर्चा केली? काय निर्णय घेतला आहे? असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. राज्य सरकारला यासाठी तीन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. तीन वाजेपर्यंत कोणती कारवाई केला जातेय? त्याचा पूर्ण आढावा आम्हाला द्या, असा आदेश कोर्टाने दिला आहे.

Jalna Live : जालन्यातून जवळपास दहा क्विंटलच्या भाकरी घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान जालन्यातील धनगर पिंपरी गावातील शेकडो मराठा बांधव भाजी भाकरी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. जवळपास दहा क्विंटलच्या भाकरी घेऊन हे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत. शासनाला केव्हा जाग येईल माहित नाही मात्र आमचे बांधव मुंबई येथे उपाशी राहू नये म्हणून आम्ही गावातून भाजी भाकरी घेऊन मुंबईकडे जात असल्याची प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिली आहे 

Pune Live : पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

स्वारगेट चौकात केला जात आहे लाक्षणिक उपोषण

मुंबईत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू आहे

पुण्यात अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले जात आहे

Mumbai Live: मराठा आरक्षण आंदोलनावर आज उच्च न्यायालयाची सुनावणी

मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात आज पुन्हा एकदा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन झाले की नाही, याची माहिती आज न्यायालयात मांडली जाणार आहे. तसेच या सुनावणीत नव्याने काही महत्त्वाचे आदेश किंवा निर्देश दिले जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरणात उत्सुकता वाढली आहे.

Mumbai Live: अटल सेतूवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

हाय कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी अटल सेतू टोल नाक्यावर तैनात होऊन मोठा बंदोबस्त उभारला आहे. आंदोलकांच्या गाड्या आतमध्ये येऊ नयेत म्हणून पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली असून गाड्या बाहेर काढण्याची तयारीही सुरू आहे. अटल सेतूवर सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Mumbai Live: मराठा आंदोलकांना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी आझाद मैदानात हजेरी लावली असून त्यांनी नोटीसीची प्रत आंदोलकांना दिली आहे. या नोटीसीत लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंदोलकांनी पुढील निर्णय काय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

OBC Live: नागपुरात ओबीसी आंदोलनाचा चौथा दिवस; सरकारच्या मसुद्याबाबत स्पष्टतेची मागणी

नागपूरात ओबीसी आंदोलन आज चौथ्या दिवशी पोहोचले असून, ओबीसी समाजाने आपला हक्क अबाधित राहावा यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत मसुदा दाखवणार असल्याची चर्चा आहे, मात्र या मसुद्यात ओबीसींच्या वाटेकऱ्यावर गदा येऊ नये, याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, मसुदा जर तयार झाला असेल, तर तो आम्हालाही दाखवला जावा. त्या मसुद्यात कोणते बदल, तरतुदी किंवा निर्णय आहेत, याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. जर त्यामध्ये आमच्या हक्कावर परिणाम करणारी कोणतीही बाब असेल, तर आम्हाला आक्षेप नोंदवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी ठाम मागणी ओबीसी समाजाने केली आहे.

Mumbai LIVE Updates: जुहू डेपोत बसमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी 10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
  • जुहू डेपोत बसमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी 10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

  • जुहू पोलिसांनी बीएनएसच्या कलम 189(2), 191(1),190,115(2), 221, 352, 324 (3) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान 3 अंतर्गत गुन्हा दाखल.

  • पोलिसांनी 10 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

  • रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मराठा आंदोलन आणि बसमधील प्रवासी यांच्यात मारहाण झाली होती

  • या मारहाणीत बसचं नुकसान देखील झालं होतं

  • बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Ashwini Vaishnaw LIVE Updates: जागतिक धोरणांतील अस्थिरतेमुळे अनिश्चितता वाढली आहे - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

जागतिक धोरणांतील अस्थिरतेमुळे अनिश्चितता वाढली आहे. अशा अस्थिर परिस्थितीत भारत स्थैर्य आणि विकासाचा दीपस्तंभ ठरत आहे : इलेक्ट्रॉनिक्स व आयटी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Manoj Jarange Patil LIVE Updates: मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही - मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, "आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन केले आहे, रस्त्यावरच्या गाड्या हटवल्या आहेत. पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारकडे एकच पर्याय आहे – मला अटक करा."

Manoj Jarange Patil LIVE Updates: कुठल्याही धमकीला राणे कुटुंब कधीच घाबरत नाही - आमदार निलेश राणे

मनोज जरांगे पाटील यांनी आमदार नितेश राणे यांचा 'चिचुंद्री' असा उल्लेख करत टीका केली होती. यावर नितेश राणेंचे भाऊ आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "टीका करा पण वैयक्तिक टीका नको. कुठल्याही धमकीला राणे कुटुंब कधीच घाबरत नाही. तुम्ही मरायला तयार असता, तसेच आम्ही राणेही तयार असतो."

Mumbai News : मराठा बांधवांनो! महिलांच्या, राखीव डब्यातून प्रवास करू नका; रेल्वेचं आवाहन

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मराठा बांधवांनी आपल्या मागण्या शांततेत तसेच लोकशाही पद्धतीने पूर्ण कराव्या मराठा आंदोलकांनी वयोवृद्ध, दिव्यांग प्रवाशांसाठी अडचण होणार नाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत मार्ग मोकळा करून द्यावा. आझाद मैदानाकडे जाण्यासाठी जाणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर करावा. महिलांच्या डब्यातून तसेच राखीव डब्यातून मराठा बांधवांनी प्रवास करू नये अशा सूचना रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन करण्यात येत आहे.

Nashik News Live : देखावे पाहण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी

Nashik: आजपासून नागरिकांना रात्री उशिरापर्यंत गणपती देखावे पाहता येणार आहे. शेवटचे पाच दिवस गणपती देखावे रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याची सार्वजनिक गणेश मंडळांची मागणी होती. गर्दी होण्याच्या मार्गावर काही ठिकाणी वाहतुकीत देखील बदल करण्यात आलाय. गणेशोत्सवातील शेवटच्या पाच दिवसात देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज आहे.

Karnataka Rain : कर्नाटकात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

बंगळूर : कर्नाटकात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात प्रामुख्याने बंगळूर आणि किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, ढगाळ हवामान कायम राहील, असे सांगण्यात आले आहे. बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांची चौकशी, मंत्री जमीर यांना अडीच कोटी कर्ज दिल्याचा ठपका

बंगळूर : गृहनिर्माणमंत्री जमीर अहमद खान यांना अडीच कोटींचे कर्ज दिल्याप्रकरणी अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांची लोकायुक्त पोलिसांनी चौकशी केली. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात लोकायुक्त पोलिसांनी गृहनिर्माणमंत्र्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत तपासले, तेव्हा त्यांना कर्ज देणाऱ्या लोकांची यादी सापडली. राधिका कुमारस्वामी यांचे नाव यादीत असल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान राधिकाने कबूल केले की, तिने दशकापूर्वी मंत्री जमीरला कर्ज दिले होते.

Pakistan Helicopter Crashes : पाकिस्तान सरकारचे हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू

लाहोर : गिलगिट-बाल्टिस्तान भागातील दायमर जिल्ह्यात आज पाकिस्तान सरकारचे हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोन जण वैमानिक होते, तर तीन जण तंत्रज्ञ होते. नव्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविण्याची चाचणी सुरू असताना हा अपघात झाला. ‘एमआय-१७’ प्रकारचे हे हेलिकॉप्टर कोसळण्यामागील कारण अद्याप कळालेले नाही.

Raju Shetti : 'महादेवी हत्तीणी'प्रश्नी पुन्हा आंदोलन करणार; राजू शेट्टी यांचा इशारा

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी हत्तीणी’ला मठामध्ये परत करण्यासाठी राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करूनही सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

Kolhapur Rain : पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन इंचांनी वाढ; 'राधानगरी'चा एक दरवाजा उघडला

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची आजही रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात सुरुरू असलेल्या पावसाने रविवारी मध्यरात्री राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन खुला होऊन २९२८ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत तीन इंचांनी वाढ झाली. रात्री ही पातळी २१ फूट सहा इंच इतकी होती. पावसाने रविवारी मध्यरात्री धरणक्षेत्रात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे राधानगरी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने स्वयंचलित दरवाजा क्रमांक-तीन उघडून त्यातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात विसर्ग सुरू राहिला. त्याचबरोबर शहरासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानला भूकंपाचा जोरदार धक्का, ८०० जणांचा मृत्यू; २५०० जण जखमी

काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपात ८०० जणांचा मृत्यू झाला असून, २५०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा होती, असे तालिबान सरकारने आज सांगितले. या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली आहेत, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने मोठ्या प्रमाणावर साहित्य पाठवले आहे.

High Court : सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा आंदोलकांना कोणताही अधिकार नाही - उच्च न्यायालय

Latest Marathi Live Updates 2 September 2025 : ‘‘वैधानिक मागणीसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा आंदोलकांना कोणताही अधिकार नाही,’’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले नेते मनोज जरांगे आणि आयोजकांना खडे बोल सुनावले. तसेच ‘‘मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करतो. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करा. मुंबईतील रस्ते तत्काळ रिकामे करा. गोंधळ करणाऱ्यांनी घरी जावे. मात्र, मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मी उठणार नाही,’’ असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. ‘मतांची चोरी म्हणजे अधिकारांची, आरक्षणाची, रोजगाराची, शिक्षणाची, लोकशाहीची आणि तरुणांच्या भवितव्याची चोरी आहे,’’ अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी टीका केलीये. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपात ८०० जणांचा मृत्यू झाला असून, २५०० जण जखमी झाले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.